Maharashtra Politics News | ‘महाविकास आघाडी हाच एक प्रकारचा लव्ह जिहाद आणि उद्धव ठाकरेंची…’, भाजपचा घणाघात (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) म्हणजे एक प्रकारचा लव्ह जिहादच (Love Jihad) आहे अशी टीका भाजपचे (BJP) प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी केली आहे. भाजपने कर्नाटकमध्ये बजरंग बलीचा नारा दिला. मात्र तो नारा चालला नाही त्यामुळे आता महाराष्ट्रात ते औरंगजेब (Aurangzeb) आणि टिपू सुलतान (Tipu Sultan) यांच्याशी (Maharashtra Politics News) संबंधित मुद्दे उकरुन काढत आहेत, असा आरोप संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला. या आरोपांना केशव उपाध्ये यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

 

काय म्हणाले केशव उपाध्ये?

महाविकास आघाडी हाच एक प्रकारचा लव्ह जिहाद आहे. उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) शिल्लक सेना स्वत:हून पडलेली ‘लव्ह जिहाद’ची बळी आहे. हिंदुत्ववादी विचार सोडून शिल्लक सेनेचे काँग्रेस (Congress)-राष्ट्रवादीसोबत (NCP) जी फरफट होतेय, तोही एक प्रकारचा लव्ह जिहादच आहे. त्यामुळे शिल्लक सेनेला आसपासचं भगव्याऐवजी हिरवं दिसायला लागलंय. (Maharashtra Politics News) शिल्लक सेना स्वतःचं किती अधःपतन करुन घेणार आहे. अहो, राऊत आमचं सोडा, तुमच्या सोबत असणाऱ्या अबू आझमीला (Abu Azmi) औरंग्या प्रिय आहे. आता तो तुम्हालाही वाटायला लागलाय का? कारण त्यावर तुम्ही तोंड उघडलेलं नाही. साप साप म्हणून भुई थोपटण्याचा धंदा बंद करा असं म्हणत केशव उपाध्ये यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

 

व्हिडिओ पहाण्यासाठी क्लिक करा

 

 

अहमदनगरमध्ये औरंगजेबाचं पोस्टर संदलच्या मिरवणुकीत नाचवण्यात आलं. तर कोल्हापूरमध्ये औरंगजेबाचं स्टेटस काही
विशिष्ट धर्मांच्या लोकांनी शिवराज्याभिषेक दिनाच्या दिवशी ठेवले होते. या दोन्ही घटनांवरून हिंदू संघटनांनी कोल्हापुरात आंदोलन केलं.
या आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं. तसंच गेल्या काही दिवसांत राज्यात लव्ह जिहादची काही प्रकरण समोर आले आहेत.
या सगळ्यावरुन संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला केशव उपाध्ये यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

 

 

Web Title :  Maharashtra Politics News | mva is like a type of love jihad case and uddhav thackeray
and his party is in love with them said keshav upadhye

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा