Shasan Aplya Dari | Pune : ‘शासन आपल्या दारी’ अभियान रविवारी गोखलेनगरमध्ये

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Shasan Aplya Dari | राज्य सरकार ‘शासन आपल्या दारी’ अभियान राबवत असून, येत्या रविवारी दि. ११ जून रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत गोखलेनगर (Gokhale Nagar Pune) मधील माधव उर्फ अप्पासाहेब कुलकर्णी शाळेमध्ये (Madhav Alias Appasaheb Kulkarni School) हा कार्यक्रम होईल, असे आमदार सिद्धार्थ शिरोळे (MLA Siddharth Shirole) यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे. (Shasan Aplya Dari)

 

शासकीय योजना लोकाभिमुख करून त्याची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ अभियान राबविले जात आहे. शासकीय योजनांशी निगडित कार्यालयांचे प्रतिनिधी आणि विविध दस्तावेज उपलब्ध करून देणारे अधिकारी आणि कर्मचारी एकाच छताखाली एकत्र येऊन नागरिकांना विविध योजनांचा लाभ करून देणार आहेत. नागरिकांनी या अभियानात सहभागी व्हावे आणि शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केले आहे.

 

Advt.

Web Title :  Shasan Aplya Dari | Pune : ‘Shasan Aaya Dari’ campaign on Sunday in Gokhale Nagar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा