CCTV Of Strong Room In Jalgaon | बारामतीपाठोपाठ आता जळगावमध्ये स्ट्राँग रूमचे CCTV काही वेळासाठी बंद, जिल्हाधिकारी म्हणाले…

जळगाव – CCTV Of Strong Room In Jalgaon | लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) मतदानानंतर ज्या सुरक्षित स्थळी मतदारसंघातील सर्व ईव्हीएम मशीन्स (EVM Machines) ठेवलेल्या असतात तिथे सीसीटीव्हीचा २४ तास वॉच आहे. मात्र, या ठिकाणचे सीसीटीव्हीचे डिस्प्ले बंद पडण्याचे प्रकार घडत आहेत. बारामतीपाठोपाठ आता जळगावमध्ये ज्या ठिकणी ईव्हीएम मशिन्स ठेवल्या आहेत त्या स्ट्राँग रूमचे सीसीटीव्ही काही वेळासाठी बंद झाले होते.

यानंतर स्ट्राँगरूमवर लक्ष ठेवून असलेल्या राजकीय पक्षांमध्ये एकच गोंधळ उडाला होता. परंतु, चार मिनिटात पुन्हा डिस्प्ले सुरू झाले.

प्रशासनाने सांगितले की, वीजपुरवठा खंडित झाल्याने सीसीटीव्हीचे डिस्प्ले बंद झाले होते. केवळ चार मिनिटांसाठी डिस्प्ले बंद होते. मात्र, व्हिडिओ चित्रीकरण सुरूच होते.

याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, चार मिनिटांसाठी डिस्प्ले बंद होते, परंतु व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरूच होते. सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना रेकॉर्डिंग दाखवल आहे. त्यामुळे कोणाचीही तक्रार नाही, असे ते म्हणाले.

दरम्यान, बारामतीमध्ये सुद्धा तब्बल ४५ मिनिटी सीसीटीव्ही चित्रिकरण बंद पडले होते.
यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती.
त्यानंतर नगरमध्ये स्ट्राँग रूमच्या प्रवेशद्वारावर एक संशयास्पद व्यक्ती सीसीटीव्हीमध्ये आढळल्यानंतर गोंधळ उडाला होता.
अशा प्रकारांमुळे सहाजिकच विरोधीपक्षांकडून संशय व्यक्त करण्यात येत आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sanjay Raut On Ajit Pawar | अजित पवाराचे उमेदवार पाडण्यासाठी शिंदे आणि यंत्रणेचे खास प्रयत्न,
निवडणुकीत ‘समृद्धी’ने डोळे दिपले : संजय राऊत

Sharad Pawar | शरद पवारांना मोठा धक्का; दोन नेते साथ सोडणार?

Ajit Pawar | अजित पवारांच्या रडारवर कोण? कोणाची जाणार खुर्ची, पदाधिकारी टेन्शनमध्ये…

Health News | दुचाकी चालवताना शेकडो तरुण-तरुणी, महिला वापरतात इयरफोन, वेळीच व्हा सावध व्हा! ‘हे’ 5 प्रकारचे गंभीर नुकसान टाळा