गांधी परिवाराच्या SPG सुरक्षेत केंद्र सरकारनं केले ‘हे’ मोठे बदल !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारनकडून गांधी परिवाराच्या सुरक्षा पुरवणाऱ्या स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (SPG) ला नवीन दिशानिर्देश देण्यात आले आहेत.गांधी परिवारातील कोणत्याही व्यक्तीला परदेशात जाताना एसपीजी सुरक्षा अनिवार्य केली गेली आहे. जर त्यांनी ही सुरक्षा नाकारली तर सुरक्षेच्या कारणावरून त्यांची परदेश यात्रा रद्द केली जाऊ शकते. या आधी परदेश दौऱ्यावर जाताना सुरक्षा रक्षक गांधी परिवाराला ठरलेल्या ठिकाणी सोडून पुन्हा भारतात परत येत असत.

दिल्लीला येईपर्यंत सोबत असणार सुरक्षा रक्षक
केंद्राने दिलेल्या नवीन सूचनांनुसार जर गांधी परिवारातील एखादा सदस्य लंडनला गेला तर तो माघारी येईपर्यंत एसपीजी सुरक्षा रक्षक त्यांच्या सोबत असणार आहेत. लंडन वरून जर गांधी परिवारातील कोणी इतर देशांमध्ये जात असेल तर एसपीजी सुरक्षा दल तेथील स्थानिक पोलीस प्रशासनाला सोबत घेणार आहे.माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच सुरक्षा रक्षकाने हत्या केली होती त्यानंतर पंतप्रधानांसाठी एक खास सुरक्षा दल बनवण्यात आले त्याच नाव एसपीजी सुरक्षा रक्षक दल आहे.

1988 मध्ये एसपीजी सुरक्षा औपचारिक बनवण्यात आली होती
बीरबल नाथ समितिच्या अहवालानुसार एसपीजीची निर्मिती करण्यात आली होती. यामध्ये अनेक दिग्गज अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. सध्या 3000 एसपीजी सुरक्षा रक्षक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गांधी कुटुंबातील सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या सुरक्षेसाठी कार्यरत आहेत.

गांधी परिवाराला द्यावी लागेल मागील काही प्रवासाची माहिती
एसपीजीच्या नवीन सूचनांनुसार गांधी परिवाराला आता प्रत्येक मिनिटा मिनिटाची खबर एसपीजी रक्षकांना द्यावी लागणार आहे. मागील काही प्रवासाबद्दल देखील गांधी कुटुंबाला विचारणा करण्यात आली आहे. या आधी परदेशात आलेल्या व्हीआयपी लोकांना सुरक्षा पुरवण्याची जबाबदारी भारतीय दूतावासाची होती मात्र आता एसपीजी यासाठी सक्षमतेने काम करणार आहे. यामुळे गांधी परिवाराच्या हालचालींवर सरकारला नजर देखील ठेवता येणार आहे.

Visit : Policenama.com