आता दररोज 1 कोटी लोकांना दिली जाईल कोरोनाची व्हॅक्सीन ! सरकार तयार करतंय नवीन योजना

नवी दिल्ली : देशात सध्या कोरोना महामारी सुरू आहे. अनेक राज्यात व्हॅक्सीनची (vaccination) टंचाई पाहता 18-44 वयाच्या लोकांना लस देण्याची केंद्र सध्या बंद करण्यात आली आहेत. या दरम्यान वृत्त आहे की, केंद्र सरकार आता दररोज एक कोटी लोकांना व्हॅक्सीन (vaccination) देण्याची योजना बनवत आहे. सूत्रांनुसार जुलैच्या दुसर्‍या किंवा तिसर्‍या आठवड्यापासून हे शक्य आहे. सध्या ही योजना अंमलात आणण्यासाठी सरकार दर महिन्याला 30 ते 32 कोटी व्हॅक्सीनचे प्रॉडक्शन करण्यावर विचार करत आहे.

येत्या महिन्यात सरकारला कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सीनचे 25 कोटी डोस मिळू शकतात. याशिवाय सरकारचे लक्ष स्पूतनिक व्ही आणि दुसर्‍या व्हॅक्सीनवर सुद्धा आहे. आशा आहे की, येत्या काळात आणखी काही परदेशी व्हॅक्सीनला सुद्धा सरकार हिरवा झेंडा दाखवू शकते. प्रत्येक लसीकरण केंद्रावर दररोज 100 ते 150 लोकांना लस देण्याची योजना आहे.

सध्या पाईपलाईनमध्ये सहा कोविड -19 लसी आहेत – सीरम इन्स्टीट्यूटची कोव्हॅक्स, बायोलॉजिकल ई ची कॉर्बेव्हॅक्स, जायडस कॅडिलाची जीकोव्ह-डी, जेनोव्हाची एमआरएनए व्हॅक्सीन, जॉन्सन अँड जॉन्सन व्हॅक्सीनची बायो ई आवृत्ती आणि भारत बायोटेकची इंट्रानॅसल कोविड -19 व्हॅक्सीन. सरकार या वर्षी देशात आरएनए व्हॅक्सीन आणण्यासाठी फायजर सोबत चर्चा करत आहे.

भारतीय शास्त्रज्ञ हे संशोधन करत आहेत की, दोन वेगवेगळ्या वॅक्सीनचे मिश्रण कोरोनावर मात करण्यासाठी जास्त परिणामकारक ठरू शकते का. भारतात लवकरच याबाबत टेस्ट केल्या जातील. या प्रयोगात त्या सर्व व्हॅक्सीन सहभागी असतील ज्यांचा वापर सध्या भारतात केला जात आहे. जर हा प्रयोग यशस्वी ठरला तर दोन वेगवेळ्या कंपन्यांचे डोस लोकांना दिले जाऊ शकतात.

आगामी काळात कोविशिल्ड व्हॅक्सीनला सिंगल शॉटच ठेवले जावे, यावर चर्चा सुरू आहे. हे जाणून घेण्याचा प्रयत्न आहे की, सिंगल शॉटच व्हायरसशी लढण्यासाठी प्रभावी आहे का. जॉन्सन अँड जॉन्स, स्पूतनिक लाईट आणि कोविशिल्ड व्हॅकसीन एकाच प्रकारच्या प्रक्रियेतून बनल्या आहेत. जॉन्सन अँड जॉन्सन आणि स्पूतनिक लाइट सिंगल डोसचीच व्हॅक्सीन आहे.

 

Also Read This : 

Pune : पुणेकरांना मोठा दिलासा ! लॉकडाऊन शिथिल करण्याबाबतचे आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडून आदेश; जाणून घ्या काय सुरू अन् काय बंद

 

मशरूम ने करा मुरूमांचा इलाज, घरच्या घरीच बनवा DIY फेसपॅक

 

कामाची गोष्टी ! कर्ज घेतले असेल तर ‘या’ 3 छोट्या चुका कधीही करू नका, होऊ शकते मोठे नुकसान;जाणून घ्या

डागांमुळे त्रस्त असल्यास, होममेड Scar Removal Cream वापरुन पहा

 

संभाजीराजेंचा गंभीर आरोप, म्हणाले – ‘सरकार माझ्यावर पाळत ठेवतंय, माझी हेरगिरी करण्याचा नेमका उद्देश माहीत नाही’

 

 

डागांमुळे त्रस्त असल्यास, होममेड Scar Removal Cream वापरुन पहा