महाराष्ट्रातील ‘या’ केंद्रीय मंत्र्यावर रुग्णवाहिका घोटाळ्याचे आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – केंद्रीय अवजड उद्योगमंत्री आणि शिवसेनेचे नेते अनंत गीते यांनी लॅपटॉप खरेदी मध्ये घोटाळा केल्याचा आरोप होत असताना त्यांच्यावर राष्ट्रवादीने रुग्णवाहिका खरेदी मध्ये घोटाळा केल्याचे आरोप ठेवले आहेत. अनंत गीते यांनी आपल्या संस्थेसाठी कार्पोरेटकडून येणार्‍या सीएसआरच्या निधीत रुग्णवाहिका खरेदी घोटाळा केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे. अनंत गीतेच्या विरोधात राष्ट्रवादीने केंद्रीय दक्षता आयुक्तांकडे तक्रार केल्याचे हि समोर आले आहे.

अनंत गीते यांनी सीएसआरच्या निधीतून आपल्याच संस्थेसाठी लॅपटॉपची खरेदी केल्याचा आरोप आम्ही मागे केला होता. आमच्या त्या आरोपाच्या विरोधात अनंत गीते यांनी मानहानीचा दावा दाखल केला होता. आता त्यांनी तो दावा मागे घेतला आहे असे नवाब मलिक यांनी म्हणले आहेत.

रायगड जिल्ह्यात कार्डीयालॉजीसारखी सुविधा असलेली रुग्णवाहिका खरेदी करून गीते यांनी हजारो कोटींचा भ्रष्टाचार केला आहे. एक रुग्णवाहिका बाजारात २४ लाखांना मिळत असताना गीते यांनी आपल्या संस्थेसाठी खरेदी करण्यात आलेल्या रुग्णवाहिकेची किंमत ६० लाख रुपये दाखवली आहे असा गंभीर आरोप राष्ट्रवादीने केला आहे. अनंत गीते हे शिवसेनेचे लोकसभेतील जेष्ठ खासदार आहेत. त्यांच्या लोकसभेतील प्रदीर्घ कारकिर्दीवरच त्यांना शिवसेनेने मंत्रिपद देऊ केले आहे. मात्र राष्ट्रवादीने केलेल्या गंभीर आरोपामुळे त्यांची प्रतिमा मलीन झाली आहे.

‘सत्यमेव जयते’ मध्ये झळकलेल्या लव्ह कमांडोचे पितळ उघडे, पोलिसांकडून अटक