धुळे : धूमस्टाईलने सोनसाखळी पळवली ; शहरात सोनसाखळी चोरांचा धुमाकूळ

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – जिल्ह्यात सोनसाखळी चोरांना पकडण्यात अद्याप हि यश आलेले नाही. शहरात सायंकाळी चौकातून, मुख्य मार्गाने पोलीस गस्त घालतात. परंतू ह्याच वेळी पोलीसांच्या नाकावर टिच्चून धुम स्टाईलने चोरट्यांनी महिलेची सोनसाखळी लंपास केली.

सविस्तर माहिती की, सोनसाखळी चोरांनी सध्या जिल्हात धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंत सोनसाखळीच्या पंधरा ते वीस घटना घडुनही चोरटे मोकाटच आहे. यामुळे महिलांमध्ये भितीचे वातावरण आहे. रविवारी सायंकाळी कबीर चौकातील ऐंशी फुटी रस्त्यावर सोनसाखळी चोरी घटना घडली. संजय खैरनार, प्रतिभा खैरनार पती-पत्नी हे दोघे जण मोटरसायकलहुन ऐंशी फुटी रस्ताहुन घराकडे जात असताना पाठीमागून दोन अज्ञात व्यक्ती काळ्या रंगाच्या मोटरसायकलवर धुमस्टाईलने पाठलाग करत येऊन महिलेच्या गळ्यातील अडीच तोळ्याची सोऩ्याची मंगलपोत गळ्याला हिसा देत खेचून पसार झाले.

मंगलपोत चालत्या मोटरसायकलवर खेचल्याने प्रतिभा संजय खैरनार महिला रस्त्यावर पडल्याने नाकाला मार लागला त्या रक्तबंबाळ झाल्या. महिलेने ओरडा केला. लोकांना वाटले की या जखमी झाल्या आहे. चौकात यावेळी खुप गर्दी झाली होती. काही वेळात कळाले की मोटरसायकलस्वारांनी सोनसाखळी चोरुन नेली. भर गजबलेल्या भागात हा प्रकार घडल्याने आश्चर्यच व्यक्त केले आहे. नागरीकांनी जखमी महिलेला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेले. चोरीची घटना पोलीसांना कळवली. घटनास्थळी पोलीसांनी धाव घेतली. काही भागात नाका बंदी करण्यात आली.

परिसरातील सीसीटिव्हीचा फायदा होईल असे पोलीसांना वाटले परंतु सिसीटिव्ही मध्ये काही फुटेज आले नाही. एक, दोन ठिकाणी कॅमेरे बंदच होते. पोलीसांची निराशाच झाली. जखमी महिला प्रतिभा खैरनार यांनी उपचार घेतल्या नंतर आझाद नगर पोलीस ठाणे गाठत अज्ञात काळी रंगाची मोटरसायकलवर दोन स्वारांनी गळ्यातील ८०/९० हजार रुपयांची सोन्यांची मंगलपोत हिसकवुन नेली. या बाबत लेखी तक्रार दिली आहे.

वडजई रोड चौकातील पोलीस चौकी नेहमीच बंदच असते. या पोलीस चौकीतून अगोदर पोलीसांची वॉकीटॉकी चोरीस गेली आहे. पोलीस नसल्याने चोरट्यांचे फावते अशी चर्चा परिसरातील नागरीक करत आहे. आझाद नगर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोग्यविषयक वृत्त

 

Loading...
You might also like