दिग्विजय सिंह यांच्या विरूध्द मजीठियांनी केली FIR दाखल, म्हणाले – ‘तबलिगींसोबत तुलना करून शीखांचं मन दुखवलं’

चंदीगढ :  वृत्तसंस्था –   महाराष्ट्रातील नांदेड येथील श्री हजूर साहिबच्या दरबारातून परत आलेल्या शीख भाविकांमध्ये कोरोना विषाणूची लागण झाल्याने पंजाबमधील राजकारण तापले आहे. खरं तर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी या घटनेबाबत शीख भाविकांची तबलिगी जमातशी तुलना करण्यासंबंधी ट्विट केले होते. ज्यावर आता शिरोमणी अकाली दलाने दिग्विजय सिंह यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

शिरोमणी अकाली दलाचे नेते आणि माजी कॅबिनेट मंत्री बिक्रम मजीठिया यांनी चंदीगडच्या सेक्टर ३ मधील पोलिस ठाण्यात तक्रार करत त्यांनी म्हटले की, शीख भाविकांची तबलीगी जमातशी तुलना केल्याने आम्हाला दुखावले आहे. यामुळे शीखांचे मन दुखावले आहे.

दिग्‍विजय सिंह काय म्हणाले होते?

दिग्विजय सिंह यांनी ट्वीट करत वाढत्या कोरोनाबद्दल शीख भाविकांना प्रश्न केला होता. ते म्हणाले होते की, याची तबलीगी जमातशी काही तुलना आहे का? यावर शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंह बादल म्हणाले होते की दिग्विजय यांनी पुन्हा एकदा शीखांची विश्वासार्हता खराब करण्याचा प्रयत्न केला आहे.

३९ शीख भाविकांचा रिपोर्ट पॉजिटीव्ह

मंगळवारी राज्यात कोरोनाचे १२१ नवीन रुग्ण आढळले. त्यानंतर संक्रमितांची संख्या एकूण १३७७ झाली. मंगळवारी गुरदासपूरमध्ये विक्रमी ४२ प्रकरणं समोर आली असून यात एक गुंड जग्गु भगवानपुरियाचा समावेश आहे. तसेच नांदेडहून परत आलेल्या ३९ भाविकांचा यात समावेश असल्याचे सांगितले जात आहे.

नांदेड गुरुद्वारा येथून पंजाबला परतल्यानंतर जवळपास चार हजार भाविकांपैकी ६०९ भाविक आतापर्यंत कोरोना पॉजिटीव्ह आढळले असून राज्यात कोरोना संक्रमितांची संख्या झपाट्याने वाढली आहे. पंजाबच्या परिवहन मंत्री रझिया सुलताना यांनी सोमवारी महाराष्ट्र कॉंग्रेस नेत्याच्या त्या कथित विधानाला फेटाळले की, नांदेडहून शीख भाविकांना आणणाऱ्या राज्यातील बस चालकांना कोरोनाची लागण झाली असावी, ते कोरोनाने संक्रमित झाले असतील.

राज्यात परतल्यानंतर मोठ्या संख्येने शीख भाविक संक्रमित आढळल्यानंतर महाराष्ट्रातील कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी हे कथित विधान केले होते.