चंद्रकांत खैरे आणि अब्दुल सत्तार ‘मातोश्री’वर !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मंत्रीमंडळाच्या विस्तारानंतर खातेवाटपापूर्वी राज्याचे मंत्री आणि शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांचे राजीनामानाट्य रंगले होते. त्यावर खुद्द अब्दुल सत्तार यांनी खुलासा करत सांगितले होते की माझ्या राजीनाम्याच्या पुड्या सोडण्यात आल्या. त्यानंतर काल रविवारी दुपारी 12.30 वाजता अब्दुल सत्तार यांनी मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. परंतु आता पुन्हा चंद्रकांत खैरे आणि अब्दुल सत्तार मातोश्रीवर दाखल झाले आहेत. त्यांचे मनोमिलन करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी या दोघांनी मातोश्रीवर बोलावून घेतल्याचे सांगितले जात आहे.

अब्दुल सत्तार यांच्या नाराजी नाट्यावर शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरेंनी हल्लाबोल केला होता. अब्दुल सत्तार गद्दार आहेत, त्यांच्यामुळेच आज शिवसेनेचा पराभव झाला आहे त्यांना पवित्र मातोश्रीची पायरी चढू देऊ नये अशी अतिशय संतप्त प्रतिक्रिया खैरेंनी शनिवारी दिली होती.

चंद्रकांत खैरे म्हणाले होते की ज्यांनी बंडखोरी केली त्यांना हाकलून देण्यात आलं. त्यांना घरी जावं लागलं आहे. बंडखोरी करणाऱ्यांवर कायदेशीर प्रक्रिया करुन कारवाई करु. आज झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेला सत्तारांच्या गटाचं मतदान झालचं नाही. त्यांना मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार नाही.

यानंतर माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि मंत्री अब्दुल सत्तार यांच्या संबंधात मीठ पडल्याचे बोलले जात होते. त्यानंतर आज दोघेही उद्धव ठाकरेंची भेट घेत आहोत. उद्धव ठाकरे यांचे मनोमिलन करण्यात यशस्वी ठरतात का हे पुढील काळात स्पष्ट होईलच.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/