Chandrakant Patil | गणेशोत्सवासाठी 200 स्वच्छतागृह, तीन व्हॉनिटी व्हॅन, पोलीस व मनपा कर्मचाऱ्यांसाठी जेवणाची व्यवस्था; पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा पुढाकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Chandrakant Patil | गणेशोत्सवसाठी पुण्यात येणाऱ्या भाविकांची गैरसोय टिळावी यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पुढाकार घेतला असून, लोकसहभागातून २०० स्वच्छतागृहे, गरोदर महिलांना आरामासाठी आणि महिलांना तीन व्हॉनिटी व्हॅन स्वरुपात हिरकणी कक्ष; तसेच पोलीस तथा महापालिका कर्मचाऱ्यांना जेवणाची मोफत व्यवस्था करण्यात येणार आहे. गणेशोत्सवाचे शेवटचे तीन दिवस आणि अनंत चतुर्दशीला ही व्यवस्था पुणे शहरातील गर्दीच्या ठिकाणी करण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील (Chandrakant Patil) यांनी दिली.

गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा सण. दरवर्षी यासाठी पुणे आणि आसपासच्या परिसरातून मोठ्या प्रमाणात गणेशभक्त गणपतीचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. त्यामुळे परगावाहून पुण्यात आलेल्या गणेश भक्तांची विशेष करुन महिलांची स्वच्छतागृहांआभावी अडचण होत असते. त्यामुळे ही अडचण दूर करण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पुढाकार घेतला असून; लोकसहभागातून २०० स्वच्छतागृहे, गरोदर महिलांना आरामासाठी आणि महिलांना तीन व्हॉनिटी व्हॅनच्या माध्यामातून हरकणी कक्ष; तसेच पोलीस तथा महापालिका कर्मचाऱ्यांना जेवणाची मोफत व्यवस्था करण्यात येणार आहे. (Chandrakant Patil)

याबाबत अधिक माहिती देताना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की,
पुणे शहरातील गणेशोत्सव संपूर्ण जगात आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे.
पुणे जिल्हा आणि आसपासच्या परिसरातून हजारो भाविक गणेश दर्शन आणि
अनंत चतुर्दशीच्या मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी येत असतात.
त्यामुळे परगावाहून पुण्यात आलेल्या गणेश भक्तांची विशेष करुन महिलांची स्वच्छतागृहांआभावी मोठी अडचण होते.
ती दूर करण्यासाठी लोकसहभागातून २०० स्वच्छतागृहे, व्हॅनिटी व्हॅनच्या स्वरुपात तीन हिरकणी कक्ष
आणि पोलीस तथा मनपा कर्मचाऱ्यांसाठी मोफत जेवणाची व्यवस्था केली आहे.
यावेळी गणेशभक्तांची गैरसोय टळणार असून, उत्सवाचा आनंद सहज लुटता येणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ganpati Immersion 2023 | पुण्यातील प्रमुख गणपती मंडळे सायंकाळी 6 नंतर विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार (व्हिडिओ)

Ajit Pawar On Eknath Khadse | ‘…तर मी डायरेक्ट विचारेन, मला मध्यस्थी लागत नाही’, एकनाथ खडसेंच्या विधानावर अजित पवारांचे सडेतोड उत्तर

Chandrashekhar Bawankule | ‘पत्रकारांना चहा पाजा, धाब्यावर न्या’ बावनकुळेंच्या विधानाची क्लिप व्हायरल, विरोधकांनी उठवली टीकेची झोड