Chandrakant Patil | भाजप-मनसे युतीवर चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान, म्हणाले…

नाशिक न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –   राज्यात सध्या नवीन राजकीय गणिते आखली जात आहे. यामध्ये आता अनेक दिवसापासून सुरु असलेल्या भाजप (BJP) आणि मनसे (MNS) युतीसंदर्भातही चर्चा केली जात आहे. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी थेट भाष्य केले आहे. ते म्हणाले, महाराष्ट्राला हवे असलेले नेतृत्त्व राज ठाकरे आहेत. पण एकट्या मनसेच्या जोरावर महाराष्ट्रात सत्ता येणे कठीण आहे. राज ठाकरे आणि माझी तशी जुनीच ओळख योग आला, तर त्यांना नक्की भेटेन. ठाकरे आमच्यापासून दूर गेले नाहीत परंतु परप्रांतियांबद्दलची मनसे जोवर भूमिका बदलत नाही, तोवर हे शक्य नाही, असे चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले.

शिवसेनेसोबतच्या (Shivsena) युतीसंदर्भात बोलताना पाटील म्हणाले, शिवसेनेसोबत आमचे काही वैर नाही. आम्ही सत्तेत नसलो म्हणून काय झालं.
जनकल्याणासाठी आम्ही आंदोलन करतो. तुम्ही एकत्रित निवडणूक लढवता, मुख्यमंत्री पदासाठी वेगळे सरकार चालते, वेगळ्या विचारांच सरकार चालते.
निर्णय परिस्थितीप्रमाणे बदलत असतात.
मात्र, ते भाजपसोबत येतील असे वाटत नसल्याचे चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले.

राष्ट्रवादी (NCP) नव्हे, अन्यायाविरोधात आक्रमक

महाविकास आघाडीतील कोणत्याही एका पक्षाविरोधात आम्ही नाही.राठोड प्रकरण आणि कारखान्यांच्या घोटाळ्यांसंदर्भात आम्ही आक्रमक आहोत.
त्यामुळे आम्ही राष्ट्रवादी विरोधात नाही तर अन्यायाविरोधात आक्रमक आहोत असे सांगत चंद्रकांत पाटील म्हणाले, ईडी ही एक केंद्रिय स्वायत्त संस्था आहे.
यामुळे त्यावर काहीही भाष्य करणार नाही आणि चौकशांना घाबरायचेही कारण नाही, असे त्यांनी सांगितले.

Web Title : Chandrakant Patil | bjp leader chandrakant patil bjp mns alliance future

MLA Rohit Pawar | जामखेडच्या सतीशला मिळाले नवे आयुष्य ! आ. रोहित पवार यांच्या माध्यमातून मिळाले मोफत उपचार

Ramdas athavle | …शरद पवार निवडून येणार नाहीत, त्यांना बळीचा बकरा करू नये

Social Media News | धोक्याची घंटा ! तुम्ही सुद्धा सोशल मीडियावर करत असाल ‘हे’ काम, तर 24 तासात डिलिट केले जाईल अकाऊंट