Chandrakant Patil | चंद्रकांत पाटलांनी उदयनराजेंसमोर हातच जोडले; म्हणाले…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर राज्यातील विरोधी पक्ष टीका, आंदोलने आणि निषेध करत आहेत. त्यांनी शिवाजी महाराजांचा अपमान होईल तसेच शिवप्रेमींच्या भावना दुखावतील असे वक्तव्य केले होते. भाजप त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत असून, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करत आहे. पण, भाजपचे एकमेव नेते पक्षाच्या विरोधी भूमिका घेत आहेत. राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्यपाल आणि प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांना हटविण्याची मागणी केली आहे. त्यावर चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मध्यस्थी केली आहे. चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी भोसलेंना हात जोडत या वादावर पडदा टाकण्याची विनंती केली आहे.

 

राज्यपालांनी शिवनेरी किल्ल्यावर पायी जाऊन छत्रपती शिवरायांचे दर्शन घेतले होते. त्यामुळे त्यांच्याकडून चुकून काही शब्द गेले असतील. त्यांना आपण माफ केले पाहिजे. आता आपल्याला हा विषय संपवावा लागेल, अशी मी हात जोडून उदयनराजे भोसलेंना विनंती करतो, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. राज्यपालांच्या मनात शिवरायांचा अनादर करण्याची भावना मुळीच नाही. तशी भावना आमच्या कोणाच्याच मनात असणार नाही, असेही पाटील म्हणाले. त्यामुळे भोसलेंनी हा वाद आता आणखी वाढवू नये, असे पाटील म्हणाले आहेत.

उदयनराजे भोसले यांनी भाजपला इशारा दिला आहे. पक्षाने माझ्यावर कारवाई केली तरी चालेल.
पण, मी शांत बसणार नाही. मला माझ्या पूर्वजांचा अपमान पाहताना यातना होत आहेत.
त्यामुळे मी बोलणार. पक्षाने राज्यपाल कोश्यारी यांच्यावर प्रोटोकॉल तपासून कारवाई करावी.
मला आशा आहे की, पक्ष कारवाई करेल; अन्यथा मी माझा निर्णय घेण्यास मुखत्यार आहे.
भोसले सातारा ते रायगड अशी शिवसन्मान यात्रा शनिवारी (दि. 3) काढणार आहेत.
यावेळी ते आपली भूमिका जाहीर करण्याची शक्यता आहे.

 

Web Title :- Chandrakant Patil | chandrakant patil has made an important appeal to udayanraje bhosle regarding the governor bhagatsinh koshyari statement

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Shinde-Fadnavis Govt | आधी मंत्रिमंडळ विस्तार, की महामंडळ वाटप? शिंदे – फडणवीसांकडून लवकरच मोठा निर्णय

CM Eknath Shinde | एकनाथ शिंदेंवर त्यांचे आमदार नाराज; ठाकरे गटाच्या नेत्यानं सांगितलं

Siddarth Jadhav | सिद्धार्थ जाधवच्या येण्याने घरात निर्माण होणार टेन्शनचे वातावरण; कारण सिद्धार्थ जाताना…..