Chandrakant Patil | ‘मंत्री तानाजी सावंतांच्या वक्तव्याची मोडतोड केली जात आहे’ – चंद्रकांत पाटील

मुंबई : Chandrakant Patil | शिंदे गटाचे (Shinde Group) राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) हे काल एका जाहीर कार्यक्रमात मराठा आरक्षणावर (Maratha Reservation) बोलताना त्यांची जीभ घसरली आणि त्यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले. या वक्तव्याचे पडसाद राज्यात उमटू लागल्यानंतर आता भाजपाचे (BJP) नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी सारवासारव करत स्पष्टीकरण दिले आहे. सावंत यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढण्यात येत असून त्यांच्या वक्तव्याची मोडतोड केली जात आहे, असे चंद्रकांत पाटलांनी म्हटले.

चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले, देवेंद्र फडणवीसांमुळेच (Devendra Fadnavis) स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच मराठा समाजाला आरक्षण मिळाले होते. मात्र, महाविकास आघाडी सरकारला (Maha Vikas Aghadi Govt) ही केस न्यायालयात व्यवस्थित चालवता आली नाही, त्यामुळे हे आरक्षण गेले. अशा वेळी अडीच वर्ष तुम्ही आंदोलने का केली नाहीत, आम्ही तुमच्याबरोबर आंदोलन केले असते, असे तानाजी सावंताना म्हणायचे होते. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याची मोडतोड केली जात आहे, असे स्पष्टीकरण चंद्रकांत पाटील यांनी दिले.

रविवारी उस्मानाबादमध्ये हिंदूगर्वगर्जना संवाद यात्रेच्या कार्यक्रमात सावंत म्हणाले होते की,
मराठा आरक्षण गेल्यानंतर दोन वर्ष तुम्ही गप्प होता आणि आता सत्तांतर झाल्यानंतर तुम्हाला आरक्षणाची खाज सुटली.
मात्र, आता पुढील दोन वर्षांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde)
आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे टिकाऊ आरक्षण मिळवून देतील, असे सावंत म्हणाले होते.

Web Title :- Chandrakant Patil | chandrakant patil reaction on tanaji sawant controversial statement on maratha reservation

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

CM Eknath Shinde Vs Shivsena | ‘मुले पळवणारी टोळी ऐकलेय, पण बाप…’, शिंदे गटाविरोधात फलकबाजी; नवरात्र मंडळाचे फलक पोलिसांनी हटवले

Maratha Reservation | ओबीसी आरक्षण बाबत बोलताना तारतम्य बाळगा, मराठा क्रांती मोर्चाचा तानाजी सावंत यांना निर्वाणीचा इशारा

Loss Belly Fat | ‘या’ आहेत त्या 5 गोष्टी ज्या फॉलो केल्याने कमी होईल वजन, गायब होईल पोटाची चरबी