Chandrakant Patil | पुण्यात अजित पवार गटविरुद्ध भाजप-शिंदे गटातील वाद टोकाला?, चंद्रकांत पाटलांनी जोडले हात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Chandrakant Patil | पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजप आणि शिंदे गटाला (CM Eknath Shinde Group) डावलून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना आणि आपल्या समर्थकांना जवळपास ८०० कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे. ही कामे तात्काळ थांबवावीत अन्यथा आम्ही न्यायालयात जाऊ, असा गंभीर आरोप जिल्हा नियोजन समितीतील भाजप आणि शिंदे गटाच्या १० सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत भाजपा नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना विचारले असता त्यांनी हात जोडत बोलण्यास असमर्थता दर्शवली.

एकूण निधीपैकी ६० ते ७० टक्के निधी अजित पवारांनी आपल्या समर्थकांनाच दिला आहे.
शिंदे गट, भाजपच्या पदाधिकाऱ्यांची केवळ पाच ते दहा टक्क्यांवर बोळवण केल्याचा आरोप या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. तसेच आपत्ती व्यवस्थापनाचा निधी जिल्ह्यात कुठलीही आपत्ती नसताना वापरण्यात आल्याचा गंभीर आरोप जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केला आहे. (Chandrakant Patil)

दरम्यान, आज चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात भाजपच्या मंडल अधिकाऱ्यांची एक बैठक आयोजित
करण्यात आली होती. या बैठकीला चंद्रकांत पाटील आले असताना त्यांना जिल्हा नियोजन समितीच्या निधी संदर्भात
भाजपच्या सदस्यांनी केलेल्या आरोपावर पत्रकारांनी प्रश्न विचारला असता चंद्रकांत पाटील यांनी हात जोडत,
तुमच्या पासून लांब राहायला हवे, असे म्हणत बोलणे टाळले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

SWaCH – Pune Municipal Corporation (PMC) | कचरा गोळा करणार्‍या ‘स्वच्छ’ संस्थेच्या लढ्याला यश; पुणे महापालिका प्रशासनाची पाच वर्षांच्या कराराला मान्यता

Pune Pimpri Chinchwad Crime News | हिंजवडीतील अ‍ॅकॉर्ड अ‍ॅटॉकॅम्प कंपनीत गॅस भट्टीचा स्फोट, 20 कामगार गंभीर जखमी; मालक, प्रशासन यांच्यावर FIR

Jitendra Awhad On Ajit Pawar | ”शरद पवार आणि काकांच्या सावलीत वाढलेले अजित पवार यांच्यात बरंच अंतर”, आव्हाडांनी दादांना सुनावले