×
HomeUncategorizedChandrakant Patil | मुळशीचे पाणी पुण्याला देण्याचा निर्णय लवकरच - चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil | मुळशीचे पाणी पुण्याला देण्याचा निर्णय लवकरच – चंद्रकांत पाटील

पुणे: पोलीसनामा ऑनलाइन – मुळशी धरणावरील जलविद्युत प्रकल्पावरुन तयार होणाऱ्या वीजनिर्मिती प्रकल्पाची आता फार आवश्यक्ता राहिली नाही, असे आमचे मत आहे. त्यामुळे टाटा कंपनीला भरपाई देऊन, हे पाणी शेती व पिण्यासाठी वापरता येईल का, असा पर्याय पुढे आला आहे. या प्रश्नाबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बैठक घेणार असून, याबाबत लवकर निर्णय घेण्यात येईल, असे पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी सांगितले. चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.

कालवा सल्लागार समितीच्या बैठकीनंतर चंद्रकांत पाटील पत्रकारांशी बोलत होते. यावेळी पाटील म्हणाले, गतवर्षी मुळशी धरणातून एक अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी पुण्यासाठी वापरण्यात आले. मात्र, यावर्षी पुण्याला पाणी पुरवठा करणारी धरणे त्यांच्या क्षमतेएवढी भरली आहेत. त्यामुळे या वर्षीच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. भविष्यात मुळशी धरणात वीजनिर्मिती न झाल्यास मुळशी धरणाचे पाणी पुण्याला वळवता येईल. सन 2014 ते 2019 या काळात भाजपचे सरकार होते. तेव्हा हा जटील प्रश्न सुटत आला होता. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारने हा प्रश्न प्रलंबित ठेवला होता. आता पुन्हा आमचे सरकार आले आहे. त्यामुळे आम्ही या प्रश्नावर विचार करत आहोत.

मुळशी धरणातील पाणी उपसा करुन पुण्याला देणे हे काम सोप्पे नाही. तसेच खर्चिक देखील आहे.
त्यामुळे याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत संवाद साधून यावर पुढील मार्ग काढता येईल, असे यावेळी चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

Web Title :-  Chandrakant Patil | decision to give mulshi dam water to pune soon testimony of minister chandrakant patil

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | जमीन खरेदी विक्री करणाऱ्या व्यावसायिकावर बोपदेव घाटात गोळीबार, शहरातील गोळीबाराची तिसरी घटना

Pune Rural Police | पुणे ग्रामीण पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक आणि त्यांच्या मुलीने एव्हरेस्टचा बेस कॅम्प 7 दिवसात केला सर

Baba Ramdev Controversy | ठाण्यातील वक्तव्यानंतर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची रामदेव बाबांना नोटीस

Must Read
Related News