Chandrakant Patil | पालकमंत्रीपद काढल्याने स्थानिक नेते, पदाधिकारी नाराज; पण चंद्रकांतदादांनी समजावले, म्हणाले…

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Chandrakant Patil | राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये (Shinde Fadnavis Govt) गेलेले अजित पवार यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले. काल-परवा राज्यात दोन नंबरचे मंत्री असलेले चंद्रकांत पाटील यांची पुण्याच्या पालकमंत्रीपदावरून उचलबांगडी करत ते अजित पवारांची (Ajit Pawar) नियुक्ती करण्यात आली, या घडामोडींमुळे पुण्यातील भाजपा नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते नाराज आहेत. यासंदर्भात झालेल्या एका बैठकीत चंद्रकांत पाटील यांनी सर्व नाराज समर्थकांना समजावले. (Chandrakant Patil)

गुरुवारी आयोजित आढावा बैठकीत सुद्धा चंद्रकांत पाटील यांनी म्हटले की, आपण पुण्याचे पालकमंत्री नसलो, तरी कायद्यान्वये सहपालकमंत्री आहोत. त्यानुसार दर दोन महिन्यांनी शहरातील प्रश्नांसंदर्भात माहिती घेणार आहे. (Chandrakant Patil)

दरम्यान, भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी शहरातील भाजपच्या आमदारांसह पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. या आमदारांनाही त्यांनी पूर्वीप्रमाणेच कामकाज सुरू राहणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले, पालकमंत्रिपद गेले असले, तरी भाजपचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी अस्वस्थ होण्याचे काहीही कारण नाही.

भाजपा आमदारांशी चर्चा करताना पाटील म्हणाले, आपली कार्यपद्धती जैसे थे राहणार आहे. शासकीय विश्रामगृह येथे सुरू केलेले कार्यालय, कर्मचारी वर्ग तसाच राहणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उपस्थितांना मार्गदर्शन करताना चंद्रकांत पाटील म्हणाले, दर दोन महिन्यांनी आढावा
बैठका आयोजित करून भाजपचे लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यात येतील.
रविवारी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत.
पुढील महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात असतील. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपर्यंत केंद्रीय मंत्री,
पदाधिकारी सातत्याने पुण्यात येणार असून, लवकरच विविध घडामोडींना वेग येईल.

पुणे भाजपामध्ये नाराजी
दरम्यान, पाटील यांना पुण्याच्या पालकमंत्रिपदावरून हटविल्यामुळे भाजपाच्या गोटात नाराजी आहे.
ज्यांच्या विरोधात आयुष्यभर लढलो, त्यांनाच पदे मिळणार असतील, तर यापुढील काळात जिल्ह्यात पक्ष वाढणार कसा,
असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केलाय. भाजपामधून मोठा विरोध असताना पवार यांनी आपल्या गृहजिल्ह्याचे
पालकमंत्रिपद मिळविण्यात बाजी मारल्याने शहर भाजपमध्ये अस्वस्थता आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

BJP Leader Vijayraj Shinde Car Accident | भाजपा नेत्याच्या कारला एसटीची धडक, एअरबॅगमुळे जीव वाचला