Chandrakant Patil On BJP MNS Alliance | ‘सध्या तरी मनसेसोबत युती शक्य नाही, परंतु…’ – चंद्रकांत पाटील

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Chandrakant Patil On BJP MNS Alliance | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरून आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून मनसे-भाजप युती (BJP MNS Alliance) होणार अशी चर्चा सुरू होती. मात्र, या चर्चेला खुद्द मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी पूर्णविराम दिला होता. दरम्यान, मशिदींवरील भोंग्यांच्या (Loudspeaker On Masjid) प्रश्नावरून राज्यात वातावरण तापले असतानाच आता पुन्हा एकदा मनसे-भाजप युतीची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, सध्या तरी भाजप-मनसे युती शक्य नाही असे सांगत या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केला. परंतु, राज ठाकरे भविष्यात मित्र असू शकतात. केंद्रीय पातळीवरूनच त्याचा निर्णय होईल असेही त्यांनी सांगितले.

राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्याच्या विषयावर राज्य सरकारला (Maharashtra State Government) 3 मे पर्यंतचे अल्टिमेटम दिला आहे. त्यामुळे भाजप आणि मनसेची भूमिका समान आहे. त्यामुळेच पुन्हा भाजप- मनसेच्या युतीची चर्चा सुरू झाली आहे. राज ठाकरे यांची भूमिका ही भाजपची पटकथा असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. त्यावर बोलताना चंद्रकांत पाटलांनी सध्या तरी मनसेसोबत युती शक्य नाही परंतु भविष्यात राज ठाकरे आमचे मित्र असू शकतात.

”कोणत्याही पक्षासोबत जायचे असेल तर त्याचा निर्णय राज्याची कोअर कमिटी घेत असते. असे असले तरी मनसेसोबत जाण्याचा निर्णय केंद्रातूनच घेतला जाईल. मात्र मनसेची परप्रांतीयांबाबत असलेल्या भूमिकेचाही विचार आम्हाला करावा लागेल. सध्या तरी युतीचा कोणताही प्रस्ताव नसल्याचेही,” पाटील यांनी स्पष्ट केले.

Web Title : Chandrakant Patil On BJP MNS Alliance | Chandrakant Patil On BJP MNS Alliance |
‘At present, alliance with MNS is not possible, but …’ – Chandrakant Patil

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | शारीरीक संबंधाचे व्हिडिओ व्हायरल करण्याची दिली धमकी;
घरी, वेगवेगळ्या हॉटेल रुममध्ये आणि कारमध्ये बोलावून लैंगिक अत्याचार

 

Navneet Ravi Rana Sent To Judicial Custody | राणा दाम्पत्याच्या अडचणीत मोठी वाढ !
कोर्टाने सुनावली 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, जामीन अर्जावरील सुनावणीही लांबणीवर

 

Pune Crime | घरात घुसून 18 वर्षाच्या तरुणीचा विनयभंग, हडपसरच्या फुरसुंगी परिसरातील घटना

 

Pune Crime | इन्स्टाग्रामवर बनला मित्र, 20 वर्षाच्या तरुणीला कोल्ड्रींग मधून गुंगीचे औषध देऊन दाखवलं ‘काम’,
बलात्कार प्रकरणी FI