Chandrakant Patil On Sanjay Raut | ‘संजय राऊतांची भाषा महाराष्ट्राच्या संस्कृतीत बसते का ?’ – चंद्रकांत पाटील

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Chandrakant Patil On Sanjay Raut | सक्तवसुली संचालनालयाने (ED) शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या मालमत्तेवर आज टाच आणली आहे. राऊत यांच्याशी संबंधित अलिबागमधील मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत (Varsha Raut) यांच्या नावाने अलिबागमध्ये खरेदी करण्यात आलेल्या जमिनीचे एकूण 8 प्लॉट आणि दादरमधील एक फ्लॅटवर ईडीकडून कारवाई केली गेली. यानंतर संजय राऊत यांनी भाजपवर (BJP) आक्षेपार्ह शब्दांचा वापर करत टीका केली. यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Chandrakant Patil on Sanjay Raut)

 

”किरीट सोमय्या चु* आहे. महाराष्ट्रद्वेष्टा आहे. जो माणूस मराठीच्या विरोधात कोर्टात जातो, तो आम्हाला अक्कल शिकवणार का ? कोण आहे तो ? मी तुमच्या बापाला घाबरत नाही. तुमचा बाप जरी खाली आला, तरी मी गुडघे टेकणार नाही,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. यानंतर चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर सवाल उपस्थित केला आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, ”संजय राऊत आज जे म्हणाले, त्यात नवीन काय ? त्यांना जे संस्कार आहेत, त्यानुसार ते बोलतात. गेल्या दोन अडीच वर्षांत रोज ते शिव्या देत आहेत. त्यांच्याकडून अशाच प्रकारच्या भाषेची अपेक्षा आहे. त्यांनी वापरलेल्या शब्दांचं एक पुस्तक तयार करायचं काम मी एकाला दिलं आहे. मी महाराष्ट्राच्या जनतेला विचारणार आहे, ‘उखडणार आहेत का ?’ ‘भिकारडे’ हे शब्द महाराष्ट्राच्या संस्कृतीत बसतात का ?” अशी विचारणाही पाटील यांनी केली आहे.

 

पुढे चंद्रकांत पाटील म्हणाले, ”एरवी आम्हाला भरपूर मार्गदर्शन केले जाते की, तुमची भाषा सांभाळा वगैरे. एक गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) कधी बोलले, तर आम्ही त्यांना ताबडतोब सांगतो की काय बोलायचे ते नीट बोलायचे. आपली संस्कृती सोडायची नाही. त्यानंतर गोपीचंद पडळकर एकदाही पवारांवर बोलले नाहीत. पण संजय राऊतांनी हे बोलणे काही नवीन नाही. माझ्याबद्दल तर ते इतके बोलले आहेत,” असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी राऊतांवर हल्लाबोल केला आहे.

 

Web Title :- Chandrakant Patil On Sanjay Raut | bjp chandrakant patil slams shiv sena sanjay raut over kirit somaiya criticism

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा