Pune Crime | लग्नानंतर अचानक भेटली प्रेयसी अन् बहरलं जुनं प्रेम ! पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर घडलं असं काही की इंजिनियर तरुणानं उचललं टोकाचं पाऊल…

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | लग्न झाल्यानंतर (After Marriage) इंजिनियर (Engineer) तरुणाला महाविद्यालयातील (College) त्याची प्रेयसी (Girlfriend) अचानक भेटली. या भेटीनंतर त्यांच्यामधील जुनं प्रेम (Love) पुन्हा बहरलं. जुन्या प्रेमासाठी इंजिनयर तरुणाने पत्नीला घटस्फोट (Divorce) दिला. परंतु त्यानंतर प्रेयसीने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे या तरुणाने गळफास (Hanging) घेऊन आत्महत्या केल्याची (Committed Suicide) घटना पुण्यातील (Pune Crime) हिंजवडी (Hinjewadi) परिसरात घडली. या प्रकरणी प्रेयसीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

आत्महत्या केलेल्या 35 वर्षाच्या इंजिनियर तरुणाच्या 64 वर्षीय वडिलांनी याबाबत सोमवारी (दि.4) हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi Police Station) फिर्याद दिली आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी 32 वर्षीय विवाहितेवर पोलिसांनी गुन्हा (FIR) दाखल केला आहे. ही घटना 13 डिसेंबर 2021 रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास हिंजवडी परिसरात घडली होती. (Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत तरुण हा महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्याच महाविद्यालयात शिकणाऱ्या एका मुली सोबत त्याचे प्रेमसंबध (Love Affair) जुळले. परंतु महाविद्यालय शिक्षणानंतर तरुण आणि त्याची प्रेयसी यांच्यात ताटातूट झाली. दरम्यान, इंजिनियरींगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तरुणाला नोकरी (Job) लागली आणि त्याचे लग्न झाले. त्याला एक अपत्य ही आहे. सर्वकाही सुरळीत सुरु असताना त्याच्या आयुष्यात महाविद्यालयातील प्रेयसी पुन्हा आली. प्रेयसीचे ही लग्न झाले होते. तसेच ती एका बाळाची आई देखील झाल्याचे तरुणाला समजले. मात्र तरीही जुन्या प्रेमाने उचल खाल्ली.

तरुण आणि त्याच्या प्रेयसी यांच्यामधील जुनं प्रेम पुन्हा बहलं. मात्र दोघांचेही लग्न झाल्याने त्यांना अडसर वाटत होता.
दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. यासाठी तरुणाने पत्नीला आणि प्रेयसीने तिच्या पतीला घटस्फोट देण्याचे ठरले.
त्यानुसार तरुणाने पत्नीला घटस्फोट दिला. परंतु प्रेयसीकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे तरुणाचा भ्रमनिरास झाला.
प्रेयसी प्रतिसाद न देता त्रास देत आहे, आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही, असे एका चिठ्ठित लिहून इंजिनयर तरुणाने 13 डिसेंबर 2021 रोजी हिंजवडी येथे राहत्या घरात बेडशीटने गळफास लावून आत्महत्या केली.
मृत मुलाच्या वडिलांनी सोमवारी (दि.4) तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी प्रेयसीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला.
आरोपी तरुणीला दीड वर्षाची मुलगी आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक बोरकर (PSI Borkar) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | engineer commits suicide over love affair filed crime against the beloved Hinjewadi pimpri chinchwad

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Prediabetes Symptoms | प्री-डायबिटीजच्या ‘या’ लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष, बचाव करतील ‘हे’ 4 आयुर्वेदिक उपाय

 

Dementia | अँटीबायोटिक्स औषधांनी वाढला ‘या’ धोकादायक आजाराचा धोका! ताबडतोब व्हा सावध

 

Summer Tips | उन्हाळ्यात Tanning पासून बचाव करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय