Shiv Sena MP Sanjay Raut | ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊत आक्रमक ! सोमय्यांना दिली शिवी, भाजपवर हल्ला; पत्रकारांनाही इशारा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Shiv Sena MP Sanjay Raut | शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांच्या मालमत्तावर आज सक्तवसुली संचालनालयाने (ED) टाच आणली आहे. ईडीने केलेल्या कारवाईनंतर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोधकांवर निशाणा साधला आहे. राऊत यांनी एकाच पत्रकार परिषदेत किरीट सोमय्यांना (Kirit Somaiya) शिवी, भाजपवर (BJP) हल्ला, पत्रकारांना इशारा आणि तपास यंत्रणांचा वाढता गैरवापर यावर भाष्य केलं आहे.

 

काय म्हणाले संजय राऊत ?
संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) म्हणाले, ”राजकीय सूड आणि बदल्यासाठीच हा प्रकार सुरु आहे.
कोणत्या थराला हे लोक जातात हे तुम्ही पाहात आहात.
भाजपचे दोन – चार नाचे आज कारवाईनंतर नाचत आहेत.
आज माझं मुंबईतील राहतं घर जप्त केलं ज्यामध्ये माझं कुटुंब राहत होतं.
भाजपच्या लोकांना आनंद झालाय. आनंदाने उड्या मारत आहेत. फटाके फोडत आहेत.
मराठी माणसाचं हक्काचं घर जप्त केल्याबद्दल आनंद आहे. असंच करत राहिले पाहिजे. यातून लढण्याची प्रेरणा मिळते.”

 

“ईडी ही सर्व कारवाई सूडबुद्धीने करत आहे. ईडीने जप्त केलेली जमीन एक एकरही नसेल.
आमच्या नातेवाईकांनी अधिकृत पैशांतून या जमिनी खरेदी केल्या होत्या.
यामध्येही ईडीला आता आर्थिक गैरव्यवहार दिसायला लागला आहे. सूडबुद्धीतूनच ही सगळी कारवाई होतीय.
पण जे होतंय ते चांगल्यासाठीच होतंय.” दरम्यान, “प्रॉपर्टी करणं हा आमचा धंदा नाही, तो तुमचा आहे.
पण महाराष्ट्रात जर कष्टाने, हक्काने 2 गोष्टी कोणी घेत असेल, त्यावर हे अमराठी लोक आक्षेप घेत असाल तर मुंबई मराठी माणसाची आहे, दामदुपटीने वसूल करु.
तो महाराष्ट्रद्वेष्टा… चुXXX” त्याच्यावर मला काही बोलायचं नाही,” अशा शब्दात संजय राऊतांनी किरीट सोमय्यांवर हल्ला केला आहे.

”मी आज ज्या दिल्लीच्या घरात राहत आहे त्याठिकाणी येऊन भाजपच्या नेत्यांनी सरकार पाडण्यासाठी मदत करा, अन्यथा परिणाम चांगले होणार नाही, अशा धमक्या दिल्या होत्या.
पण बाळासाहेबांचा सैनिक आहे. त्यांचा बाप आला तरी मी गुडघे टेकणार नाही.” तर, ‘ED ही सर्व कारवाई सूडबुद्धीने करत आहे.
ईडीने जप्त केलेली जमीन एक एकरही नसेल.
आमच्या नातेवाईकांनी अधिकृत पैशांतून या जमिनी खरेदी केल्या होत्या.
यामध्येही ईडीला आता आर्थिक गैरव्यवहार दिसायला लागलाय. असं राऊत म्हणाले.

 

दरम्यान, ”2009 साली आमच्या कष्टातून घेतलेली जागा आणि घरावर ईडीने कारवाई केली.
आधी कधीच कुणी आमची चौकशी केली नाही. विचारणा केली नाही.
माझी मालमत्ता जप्त केल्याचं आता मी टीव्हीला पाहिलं.
एक रुपया जरी मनी लॉन्ड्रिंगचा आमच्या खात्यात आला असेल आणि आम्ही प्रॉपर्टी घेतली असेल तर आम्ही सर्व प्रॉपर्टी भाजपला दान करु,” असं देखील संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

 

Web Title :- Shiv Sena MP Sanjay Raut | shivsena mp sanjay raut aggressive press conference after ed enforcement directorate attached his property

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा