Chandrakant Patil – Pune PMC | मोठ्या शहरांच्या तुलनेत छोटी गावे आणि नगरपालिकांचे व्यवस्थापन योग्य होते ! देवाची उरूळी, फुरसुंगी गावे वगळण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले समर्थन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Chandrakant Patil – Pune PMC | शहरांच्या भौगोलिक सीमा मोठ्या झाल्यास प्रशासकीयदृष्टया व्यवस्थापन करण्यासाठी ‘बोजड’ होतात. त्यातुलनेने छोट्या गावांचे नगरपालिका, ग्रामपंचायतींच्या माध्यमातून करणे सोपे होते. त्यांना राज्य आणि केंद्र शासनाकडून निधीही उपलब्ध होत असल्याने विकास करणे सहज शक्य होते, असे माझे मत आहे. नागरिकांची मागणी देखिल तशीच होती, म्हणूनच मुख्यमंत्र्यांनी देवाची उरूळी (Uruli Devachi) आणि फुरसुंंगी (Fursungi) ही गावे वगळण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्टीकरण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. (Chandrakant Patil – Pune PMC)

 

चंद्रकांत पाटील यांनी आज महापालिकेमध्ये झोनल उपायुक्त आणि १५ क्षेत्रिय अधिकार्‍यांसोबत बैठक घेतली. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री असताना महापालिका हद्दीत समाविष्ट करण्यात आलेल्या ११ गावांपैकी देवाची उरूळी आणि फुरसुंगी ही दोन गावे वगळून स्वतंत्र नगरपालिका निर्माण करण्याचा निर्णय विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी घेतला आहे. तसेच वाघोली येथील एका नागरिकांच्या मागणीवरून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या नगरविकास विभागाकडे वाघोली नगरपालिका करावी, अथवा वाघोली- हडपसर (Wagholi Hadapsar) अशी नवीन महापालिका करावी, अथवा वाघोलीचा स्वतंत्र आराखडा तयार करून राज्य शासनाकडून निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली आहे. यावर नगरविकास विभागाने महापालिकेकडे अभिप्राय मागविला आहे. अवघ्या पाच वर्षांमध्ये नागरिकांच्या हरकती व सूचना घेतल्यानंतर महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेली गावे वगळण्याच्या कार्यवाहीने जोर धरल्याने नागरिकांमध्ये गोंधळ उडाला आहे. या पार्श्‍वभूमीवर तत्कालीन महसुल मंत्री व विद्यमान पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना पत्रकार परिषदेत प्रश्‍न विचारण्यात आले. (Chandrakant Patil – Pune PMC)

 

पाटील म्हणाले, की मोठ्या शहरांच्या तुलनेत छोट्या गावांमध्ये प्रशासकीयदृष्टया व्यवस्थापन करणे सोपे जाते. भौगोलिकदृष्टया विस्तारलेल्या शहरांमध्ये काम करताना प्रशासनावरही मर्यादा येतात. दुसरीकडे छोट्या गावांना केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांमधून मोठ्याप्रमाणावर निधी मिळतो. त्यामुळेच देवाची उरूळी आणि फुरसुंगी ही गावे वगळण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या भुमिकेला माझा पाठींबा आहे. यासंदर्भातून त्यांनी कोल्हापूर महापालिकेमध्ये समाविष्ट केलेल्या व नंतर वगळण्यात आलेल्या गावांचे उदाहरण दिले.

 

मोठ्या प्रकल्पांसाठी ठेकेदारांकरिता महापालिकांनी कर्ज काढण्यासाठी हरकत नाही; वारजे हॉस्पीटलसाठी ठेकेदारांनी कर्ज काढण्यास पालकमंत्र्यांचे समर्थन वारजे येथे डीबीएफओटी (DBFOT) तत्वावर ३६० कोटी रुपये खर्चून ३५० बेडस्चे मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटल उभारण्यात येणार आहे. या हॉस्पीटलसाठी ठेकेदाराकरिता महापालिकेच्या नावे ३६० कोटी रुपये कर्ज काढण्यात येणार आहे. ठेकेदारासाठी महापालिका प्रथमच कर्ज काढत असल्याचे पाटील यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. यावर स्पष्टीकरण देताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, की मोठ्या प्रकल्पांसाठी राज्य शासनही अंगीकृत संस्थांच्या नावे कर्ज घेते.
मोठे रस्ते असेच विकसित करण्यात आले आहेत.
महापालिकांनाही पुढील काळात याचा विचार करावा लागेल.
कर्ज महापालिकेच्या नावावर काढले तरी व्याजासह हप्ते संबधित ठेकेदारच भरणार आहे.
महापालिकेने कर्ज काढल्यास पालिकेचे पतमानांकन घसणार आहे, याकडे लक्ष वेधले असता पाटील म्हणाले,
याच तांत्रिक बाबीवर विचार सुरू असून त्यावर मार्ग काढण्यात येईल.

 

Web Title :- Chandrakant Patil – Pune PMC | Compared to big cities, small villages and municipalities were properly managed! Guardian Minister Chandrakant Patil supported the exclusion of Devachi Uruli, Fursungi villages

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Dsk Vishwa Water Problem – MP Supriya Sule | डीएसके विश्वचा पाणीप्रश्न लवकरच सुटणार

MP Udayanraje Bhosale | ‘…तर मी आव्हानांना भीक घालत नाही’, उदयनराजेंचा अजित पवारांना टोला (व्हिडिओ)

RAJIV Gandhi e -Learning School Pune | राजीव गांधी ई-लर्निंग स्कुलला ‘ISO 9001’ मानांकन