मी तसं म्हटलोच नाही ; चंद्रकांत पाटलांचा ‘त्या’ वक्तव्यावरून ‘घुमजाव’

बारामती : पोलीसनामा ऑनलाईन – आमदार नितेश राणे यांनी केलेल्या गोवा हायवेच्या अभियंत्यावर चिखलफेक केली होती. याप्रकरणी त्यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा कलम लावू, असं महसूल मंत्री चंद्रकांत पाटलांनी म्हटल्याची ध्वीनीचित्रफित व्हायरल होत होती. त्यावर चंद्रकांत पाटलांनी स्पष्टिकरण दिले आहे. नितेश राणेंवर कठोर कारवाई करणार असल्याचा शब्द उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्या कुटुंबियांना दिला आहे, हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्याचं म्हटलं नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

व्हायरल व्हीडिओमध्ये चंद्रकांत पाटील स्पष्टपणे हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करायला लावू असं म्हणत आहेत, हे स्पष्ट दिसत आहे. तरीही मी असं म्हटलोच नाही, असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील हे स्वतःच्या अधिकाऱ्याचीही दिशाभूल करत आहेत, असं म्हटलं जात आहे.

तसंच चंद्रकांत पाटलांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावरही निशाणा साधला होता. त्यावरूनही चंद्रकांत पाटलांनी घुमजाव केला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये बारामती जिंकणार, असा दावा मी कधीच केला नव्हता, कारण बारामतीमध्ये अजितदादांनी केलेली विकास कामं पाहता त्यांना बारामतीत पराभूत करणं हा आशावाद ठरेल. मात्र २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही बारामती लोकसभा मतदारसंघावर निश्चितपणे वर्चस्व गाजवू, असं चंद्रकांत पाटलांनी सांगितले.

दरम्यान, मी वेगळ्या प्रकारचा राजकारणी आहे. त्यामुळे मी हे खुलेपणाने मान्य करतो, असं सांगत या माझ्या विधानामुळे अजित दादांनाही निश्चित बरं वाटेल, असंही त्यांनी यावेळी म्हटलं.

आरोग्यविषयक वृत्त –

‘त्वचा’ होईल तजेलदार आणि वाढेल ‘डोळ्यां’ची क्षमता, दररोज ‘हे’ करा

पावसाळ्यात ‘मेकअप’ करताना ‘या’ गोष्टींची काळजी घ्या

तुमच्या ‘आयब्रो’ चा रंग अधिक डार्क करण्यासाठी वापरा ‘या’ टिप्स

‘गुळ’ या आजारांवर ठेवतो नियंत्रण

द्रुतगती महामार्गावर भिषण अपघातात तीन ठार, एक गंभीर जखमी

माजी खासदार राजीव सातव यांचे मराठवाडा प्रदेश कार्यकारिणी च्या अध्यक्ष पदी नाव चर्चेत

अर्थसंकल्प सादर केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ