Chandrapur Crime | काय गुरुजी तुम्हीपण..! शिक्षकच निघाला गांजा तस्कर

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाइन – विद्यार्थ्यांचे (Students) आयुष्य सुधरवण्यापेक्षा त्यांना व्यसनाधीनतेत (Addiction) ढकलण्याचा प्रयत्न शिक्षक करत असल्याचे चंद्रपूर जिल्ह्यात (Chandrapur Crime) समोर आले आहे. शनिवारी स्थानिक गुन्हे शाखेने (Local Crime Branch) गांजा (Marijuana) तस्करी (Smuggling) करणाऱ्या शिक्षकासह (Teacher) एकाला अटक (Arrest) केली आहे. तेलंगणातुन (Telangana) गडचिरोलीमार्गे (Gadchiroli) चंद्रपूर (Chandrapur Crime) येथे गांजा घेऊन येताना चीचपल्ली गावाजवळ (Chichpalli Village) ही कारवाई केली.

 

शिक्षक श्रीनिवास नरसय्या मचेडी Srinivas Narasaya Machedi (वय 50), शंकर बलय्या घंटा Shankar Balaya Ghanta (वय-29, दोघेही रा. तेलंगणा) अशी टक्के करण्यात आलेल्यांची नावे असून पोलिसांनी त्यांच्याकडून 103 किलो 839 ग्रॅम गांजासह सुमारे 41 लाख 15 हजार 170 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दोन चार चाकी वाहनातून परराज्यातून गडचिरोली मार्गावरून चंद्रपूरकडे (Chichpalli Village) गांजा आणण्यात येत असल्याची माहिती मिळाली होती.
त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने वेगवेगळी पथके तयार करून मूल-चंद्रपूर रोडवर (Mul-Chandrapur Road) चिचपल्ली गावाजवळील ढाब्याजवळ पाळत ठेवली.
तपासणी सुरू असताना ज्या वाहनांची माहिती मिळाली होती ती तिथे येताच त्यांची तपासणी केली.
या वाहनांमध्ये 51 पाकिटांमध्ये 103 किलो 839 ग्रॅम वजनाचा 31 लाख 15 हजार 170 रुपये किमतीचा गांजा आढळला.
पोलिसांनी दोन्ही वाहनांसह सर्व 41 लाख 15 हजार 170 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

 

 

Web Title :- chandrapur Crime | guruji you too only a teacher went to chandrapur to smuggle cannabis in chandrapur

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sanjay Raut On Yashwant Jadhav Diary | यशवंत जाधवांच्या डायरीतील ‘मातोश्री’च्या उल्लेखाबाबत संजय राऊतांचं मोठं विधान !

 

Chandrakant Patil | ‘तिजोरीच्या चाव्या राष्ट्रवादीकडे, शिवसेना – काँग्रेस मंत्र्यांनी फक्त गाड्या फिरवायच्या’ – चंद्रकांत पाटील

 

Pune Corporation | पुणे महापालिकेने ‘ई मोटारी’ घेतल्या पण चार्जिंगसाठी जावे लागते ‘भोसरी;ला