Chandrasekhar Bawankule | अगामी महापालिका निवडणुकीत तिकाट कसे मिळणार, बावनकुळेंनी स्पष्टच सांगितले

मीरारोड : पोलीसनामा ऑनलाइन – अगामी महापालिका निवडणुकांच्या (Municipal Elections) पार्श्वभूमीवर भाजपा (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी भाईंदर येथील शहर आणि जिल्हा कार्यालयात आमदार गीता जैन (MLA Geeta Jain) यांच्या उपस्थितीत बैठक घेतली. यावेळी त्यांनी नगरसेवक पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी कशी दिली जाणार आहे, हे उपस्थितांना स्पष्ट सांगितले. प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदाच बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) भाजपच्या भाईंदर येथील शहर जिल्हा कार्यालयात आले होते.

 

या बैठकीला आमदार गीता जैन यांच्यासह प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील (Vikrant Patil), भाजप जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवी व्यास (Adv. Ravi Vyas), महिला अध्यक्षा रीना मेहता (Reena Mehta), माजी अध्यक्ष हेमंत म्हात्रे सह अनेक नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी पदाधिकारी आणि कार्यर्त्यांना मार्गदर्शन करताना म्हटले की, आगामी महापालिका निवडणुकीत एखाद्या नेत्याच्या मागे धावून वा त्याच्या शिफारशी वरून तिकीट मिळणार नाही, तर पक्षाचा सर्वेक्षण अहवाल आणि जनता सांगेल त्याच कार्यकर्त्याला तिकीट मिळणार आहे.

बावनकुळे म्हणाले की, येणार्‍या पालिका निवडणुका युती ने लढणार आहोत.
मीरा भाईंदर मध्ये महापौर भाजपचाच होणार असून खासदार, आमदार सुद्धा भाजपचा असेल.
ते पुढे म्हणाले, संघटनेत पक्षाचा अध्यक्ष अंतिम असतो व मीरा भाईंदर हा भाजपचा गड आहे.
व्यास यांनी अजिबात चिंता करू नये, त्यांना पक्षा कडून पूर्ण ताकद देणार आहे.
कोणी नेत्याच्या मागे धावून वा शिफारस करून तिकीट मिळणार नाही.
सर्व जागांचे सर्वेक्षण केले जाईल, ज्यांची क्षमता आहे व जनता सांगेल त्यांनाच तिकीट दिले जाणार आहे.
त्यामुळे नेत्यांच्या मागे फिरू नका, जनतेच्या मागे फिरा.

 

Web Title :- Chandrasekhar Bawankule | running behind the leader will not get a ticket in the municipal elections bawankule clearly said who will give the ticket

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ramraje Naik Nimbalkar | गोरें हे काय देशातील पक्षाचे मालक झालेत का? आ. रामराजेंचा आ. गोरेंना टोला

Shivendra Raje Bhosale | आपली कॉलर आपल्या मानेवरच चांगली दिसते शिवेंद्रराजेंचा उदयनराजेंना टोला

MNS On Shivsena | मनसेची शिवसेनेवर टीका, शिवतीर्थावरच्या टोमणे मेळाव्यासाठी मांडवली झाली म्हणे… मी तुझ्याकडे, तू माझ्याकडे गर्दी कर