Chandrashekhar Bawankule | भाजपसोबत 164 आमदार, सरकारला कोणताही धोका नाही – चंद्रशेखर बावनकुळे

ADV

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या गोटातील आमदार बच्चू कडू (MLA Bacchu Kadu) राजकीय गोंधळ घालत आहेत. त्यांनी 1 नोव्हेंबरपर्यंत आपण वेगळा निर्णय घेऊ, अशा इशारा शिंदे-फडणवीस सरकारला (Shinde-Fadnavis Government) दिला आहे. त्यावर भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी भाष्य केले आहे. आमच्यासोबत 164 आमदार आहेत, त्यामुळे आमच्या सरकारला कोणताही धोका नाही, असे चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले आहेत.

 

ADV

बच्चू कडू यांनी आपल्यासोबत 8 – 10 आमदारांचा गट आहे, असे म्हंटले आहे. तसेच नोव्हेंबरच्या पहिल्या तारखेपर्यंत जर का त्यांच्यावर 50 कोटी घेतल्याचे आरोप केलेल्या रवी राणा (Ravi Rana) यांनी माफी मागितली नाही, तर वेगळा निर्णय घेण्याचा विचार करणार असल्याचे सांगितले आहे. त्यावर बावनकुळे बोलत होते.

 

आमच्याकडे 164 आमदार आहेत. आम्हाला कोणताही धोका नाही. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी (NCP) हे आपले कार्यकर्ते फुटू नयेत, यासाठी सरकार पाडण्याच्या वल्गना करत आहेत. ते जनतेत संभ्रम निर्माण करत आहेत. मी राज्यात दौरा करत असून, या तिनही पक्षातील कार्यकर्ते मला भेटत आहेत. ते भाजपमध्ये प्रवेश करण्यात उत्सुक आहेत, असे बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले.

कडू आणि राणा दोघेही समजदार आहेत. दोघेही प्रभावी आणि प्रामाणिक कार्यकर्ते आहेत.
त्यामुळे त्यांनी शांततेने घेतले पाहिजे. त्यांच्यात गैरसमजामुळे भांडणे सुरु आहेत.
लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)
त्यांच्यासोबत चर्चा करुन मध्यम मार्ग काढतील, असे देखील बावनकुळे म्हणाले.

 

Web Title :- Chandrashekhar Bawankule | 164 mlas with bjp no threat to government

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Terence Lewis | मला मॅसेजद्वारे शिवीगाळ केली…, नोरा फतेहीला चुकीचा स्पर्श केल्याच्या प्रकरणात कोरियोग्राफरचा खुलासा

Aaditya Thackeray | गद्दारांनी खोके स्वतःला ठेवले, मदतीसाठी दिले नाहीत; शेतकर्‍यांच्या बांधावरुनच थेट आदित्य ठाकरेंनी सुनावले

Keshav Upadhye | ‘वर्षभरापूर्वीच गुजरातेत गेलेल्या प्रकल्पावरून टीका म्हणजे स्वत:चे पाप झाकण्याचा प्रयत्न!’ केशव उपाध्ये यांची टीका