Aaditya Thackeray | गद्दारांनी खोके स्वतःला ठेवले, मदतीसाठी दिले नाहीत; शेतकर्यांच्या बांधावरुनच थेट आदित्य ठाकरेंनी सुनावले

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – अतिवृष्टी आणि परतीच्या पावसामुळे राज्यातील शेतकरी (Rain in Maharashtra) पूर्णपर्ण उद्ध्वस्त झाला आहे. दिवाळीच्या सणात (Diwali Festival) सुद्धा शेतकर्याच्या घरात अंधार पसरलेला होता. ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी विरोधी पक्ष करत आहेत, पण शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) दिवाळी पहाट कार्यक्रम, मेळावे आणि इतर आरोप-प्रत्यारोप करण्यात दंग आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena Party Chief Uddhav Thackeray) यांनी मराठवाड्यात जाऊन शेतकर्यांच्या नुकसानीची पाहणी केली होती, त्यावेळी सुद्धा उद्धव ठाकरे यांच्यावरच सत्ताधारी तुटून पडल्याचे विचित्र दृश्य दिसत होते. आता युवासेनेचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनीसुद्धा शेतकरी नुकसान पाहणी दौरा सुरू केला आहे. आज आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी नाशिक येथे पाहणी करून थेट शेतकर्याच्या बांधावरूनच शिंदे-फडणवीस सरकारला सुनावले.
आत्ताच धामणगाव, इगतपूरी, जिल्हा नाशिक इथे पावसाने शेतीचे नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांची भेट घेतली आणि त्यांना धीर दिला. सांगितलं की, यापूर्वीही अशी अनेक संकटे आली होती, पण त्याचा तुम्ही सामना केलात. आत्ताही तुम्ही घाबरू नका. आम्ही तुमच्या सोबत आहोत! pic.twitter.com/28Rit6TzfS
— Aaditya Thackeray (@AUThackeray) October 27, 2022
शेतकर्यांना धीर देण्यासाठी शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी गुरुवारी नाशिक येथील नुकसानग्रस्त शेतकर्यांची भेट घेतली. यावेळी शेतकर्यांच्या मागण्या, त्यांचे झालेले नुकसान याबाबतची माहिती त्यांनी घेतली. यानंतर शिंदे-फडणवीस सरकारवर प्रहार करताना आदित्य म्हणाले, आम्ही शेतकर्यांसोबतच आहोत. प्रशासनाला तातडीने मदत करायला लावू. या गद्दारांनी खोके केवळ स्वतःसाठी ठेवलेत मदतीला दिले नाहीत.
नाशिकमधील पांढुर्ली येथील शेतकर्यांसोबत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, कोणीही धीर सोडू नका; उद्धव साहेबांनी फक्त तुमच्यासाठी आम्हाला येथे पाठवले आहे.
गद्दारांनी खोके त्यांच्याजवळ ठेवले मदतीला दिले नाहीत. पण आम्हाला राजकारण करायचे नाही.
ओला दुष्काळ (Wet Drought) जाहीर झाला पाहिजे ही शेतकर्यांची मागणी आहे आणि याबाबतचा आवाज आम्ही विधानसभेत उठवू.
आदित्य ठाकरे यांनी येथील शिंदे ग्रामस्थांशी चर्चा केली असता ग्रामस्थांनी राज्य सरकारबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.
आम्हाला मदत सोडा, भेटायला पण मुख्यमंत्री आले नाहीत, असे शेतकरी म्हणाले.
Web Title :- Aaditya Thackeray | former minister aditya thackeray met farmers in nashik criticize shinde camp mlas
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
MLA Bachchu Kadu | रवी राणा आणि बच्चू कडू यांनी समजुतीने घेतले पाहिजे – आ. श्रीकांत भारतीय