Chandrashekhar Bawankule | ‘चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा’ – साहेब प्रतिष्ठान

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्यावर जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी साहेब प्रतिष्ठानच्या वतीने दत्तवाडी पोलीस ठाण्यात (Dattawadi Police Station, Pune) करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जादूटोणा केला आहे, असे विधान चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी साताऱ्यात केले होते.

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे भोंदूबाबा असून त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जादूटोणा करुन आपल्याकडे वळविले आणि महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. तसेच त्यांची ही पत्रकार परिषद सर्व वाहिन्यांनी दाखविली. त्यामुळे त्यांनी केलेले विधान कायद्याने चुकीचे असून, त्यांच्यावर जादूटोणा विरोधी कायदा (2013) नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा, तसेच शरद पवार यांची प्रतिष्ठा जनमाणसांत मलीन केल्याबद्दल त्यांच्यावर मानहानीचा देखील गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी साहेब प्रतिष्ठानच्या (Saheb Pratishthan) वतीने करण्यात आली आहे. दत्तवाडी पोलीस ठाण्यात या प्रतिष्ठानने लेखी तक्रार दिली आहे.

उद्धव ठाकरे पूर्णपणे काँग्रेसमय झाले आहेत. त्यांनी सर्व काही काँग्रेस धार्जिने केले आहे.
आता केवळ त्यांनी काँग्रेसचे संविधान स्वीकारण्याचे बाकी ठेवले आहे.
तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जादूटोणा केला आहे.
उद्धव ठाकरे पूर्णपणे शरद पवार यांच्या जाळ्यात अडकेल आहेत.
त्यामुळे त्यांनी हिंदुत्व सोडले. शिवसेनेचा विचार सोडला आणि काँग्रेस राष्ट्रवादीसोबत गेले आहेत.
शरद पवार यांच्या कचाट्यात जो येतो, तो कधी सुटत नाही, असे चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले होते.
त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे.

 

Web Title :- Chandrashekhar Bawankule | “A case should be registered against
Chandrasekhar Bawankule under the Anti Witchcraft Act” – Saheb Pratishthan

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा