Shah Rukh Khan | कस्टम ड्युटी न भरल्यानं किंग खानला मुंबई विमानतळावर…; जाणून घ्या नेमकं काय झालं

पोलीसनामा ऑनलाईन टीम : बॉलिवूडचा (Bollywood) बादशाह शाहरुख खानला (Shah Rukh Khan) मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) कस्टम विभागाकडून (Customs Department Mumbai) अडवण्यात आले आहे. शाहरुख खानकडे काही महागडी घड्याळं आणि त्यांचे कव्हर होते. या सगळ्यांची किंमत 18 लाख रुपये आहे. त्यामुळे शाहरुखला 6.83 लाखांची कस्टम ड्युटी (Customs duty) भरावी लागली. (Shah Rukh Khan)

 

काय आहे नेमके प्रकरण?

शाहरुख खान एका कार्यक्रमासाठी दुबईला (Dubai) गेला होता. त्या ठिकाणाहून परत येत असताना मुंबई विमानतळावर कस्टम विभागाने त्याला अडवले. यानंतर त्याची सुमारे एक तास चौकशी करण्यात आली. यानंतर त्याच्या सामानाची झडती घेतली असता त्याच्या बॅगमध्ये अनेक महागड्या घड्याळांचे रिकामे बॉक्स सापडले. या घड्याळांची किंमत लाखो रुपये आहे. पण त्याची कस्टम ड्युटी न भरल्याने शाहरुखची चौकशी करण्यात आली. यावेळी शाहरुखसोबत त्याची मॅनेजर पूजा ददलानी (Pooja Dadlani) आणि बॉडीगार्डचीदेखील चौकशी करण्यात आली. (Shah Rukh Khan)

 

या प्रकारामुळे शाहरुखला 6 लाख 87 हजार रुपयांचा दंड भरावा लागला आहे. शाहरुखचा बॉडी गार्ड रवीने (Body guard Ravi) 6 लाख 87 हजार रुपयांचा कर भरला आहे. हे बिल शाहरुखच्या बॉडी गार्डच्या नावावर आहे. कस्टम विभागाचे सहाय्यक आयुक्त युधवीर यादव (Yudhveer Yadav, Assistant Commissioner of Customs Department) यांच्याकडून हि कारवाई करण्यात आली. शाहरुख खान 41 व्या शारजाह इंटरनॅशनल बुक फेअर (Sharjah International Book Fair) या कार्यक्रमासाठी दुबईत गेला होता. या कार्यक्रमातून परतत असताना मुंबई विमानतळावर हि संपूर्ण कारवाई करण्यात आली.

 

 

Web Title :- Shah Rukh Khan | shah rukh khan was stopped by the
customs department at mumbai airport had to pay lakhs of rupees

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा