Chandrashekhar Bawankule | प्रदेशाध्यक्ष होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितला भाजपचा ‘मास्टर प्लान’

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे आक्रमक नेते चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या हाती भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची (BJP State President) सूत्र सोपवण्यात आली आहेत. चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांची कॅबिनेट मंत्रिपदी (Cabinet Minister) वर्णी लागल्याने पक्षाचं प्रदेशाध्यक्ष पद रिक्त झालं होतं. त्यांच्याजागी आता चंद्रशेखर बानवकुळे (Chandrashekhar Bawankule) यांची निवड करण्यात आली. त्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपचा पुढील काळातील मास्टर प्लान (Master Plan) काय असणार याची माहिती दिली.

 

चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले, मी वरिष्ठ नेतृत्वाचे आभार मानतो. भाजप सध्या राज्यात नंबर वनच आहे. आता पुन्हा बूथ शक्ती मजबूत करुन येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत (Election) भाजपला चांगलं यश मिळवून देऊ. आगामी लोकसभेत (Lok Sabha) शिवसेना-भाजपा युतीला (Shiv Sena-BJP Alliance) 45 प्लस आणि विधानसभेत (Legislative Assembly) 200 प्लस जागा जिंकण्यासाठी प्रयत्न करणार आहे. महापालिका, जिल्हा परिषदा निवडणुकीत पक्षाला नंबर वन ठेवण्यासाठी कार्यकर्त्यांची ताकद तयार करु. पक्षाने जो विश्वास व्यक्त केला त्याला तडा जाणार नाही यासाठी मी काम करेन असं त्यांनी सांगितले.

 

तसेच देशातील नेतृत्वाचं मार्गदर्शन घेऊन आगामी काळात कार्यकर्त्यांची शक्ती वाढवणार आहे. माझी कार्यकर्ता म्हणून निवड झाली आहे. राज्यातील बारा कोटी जनतेला सोबत घेऊन आम्ही कम करणार आहोत. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे सरकार आणि राज्यात शिंदे-फडणवीस सरकार यांच्याशी समन्वय करुन सत्ता आणि संघटना यांचा मिलाप करुन जास्तीत जास्त समाजाचे प्रश्न, शेवटच्या घटकातील माणसांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

 

कोण आहेत चंद्रशेखर बावनकुळे ?

चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे फडणवीस सरकारच्या (Fadnavis Govt) काळात ऊर्जा मंत्रिपदाची धुरा होती.
डिसेंबर 2014 मध्ये नागपूरचे पालकमंत्री म्हणूनही त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.
त्यांनी नागपुरातील कामाठी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते.
2004, 2009, 2014 असे सलग तीन वेळा ते विधानसभेवर निवडून आले होते.
ते ऊर्जा, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय महाराष्ट्र, राज्य उत्पादन शुल्क मंत्री होते.

 

Web Title :- Chandrashekhar Bawankule | as soon as he became the state president
Chandrashekhar bawankule told the election target of bjp

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा