Chandrashekhar Bawankule | ‘शरद पवारांचं राजीनामानाट्य म्हणजे तमाशातील वगनाट्य!’ चंद्रशेखर बावनकुळेंचा घणाघात (व्हिडिओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मागील अनेक दिवसांपासून राष्ट्रवादीचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) भाजपच्या (BJP) संपर्कात असल्याची चर्चा सुरु होती. अखेर शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्या राजीनाम्यानंतर य चर्चेवर पडदा पडला. परंतु अजित पवार खरंच भाजपच्या संपर्कात होते का यासंदर्भात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी खुलासा केला आहे. यात भाजपचा कुठलाच डाव नव्हता. अजित पवारांचा आणि माझा गेल्या चार महिन्यापासून संपर्क झाला नाही. ते आमच्या कोणत्याही नेत्याच्या संपर्कात नव्हते असं चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी सांगितले.
राष्ट्रवादीचे खेळ म्हणजे…
राष्ट्रवादीमध्ये मागच्या तीन दिवसांत जे काही झालं ते सगळी स्क्रिप्ट होती. शरद पवार साहेबांनी रयत शिक्षण संस्थेचा (Rayat Shikshan Sanstha) अध्यक्ष होण्यासाठी घटना बदलली. राज्यात अशा अनेक शिक्षण आणि सहकारी संस्था आहेत ज्यांच्या घटना बदलून शरद पवार अध्यक्ष झाले आहेत. त्यामुळे शरद पवार हे दुसरं कोणाला पक्षाचा अध्यक्ष कसा होऊ देतील. राष्ट्रवादीचा तीन दिवसांचा खेळ म्हणजे नौटंकी आणि घरगुती तमाशा होता. घरगुती तमाशा मध्ये जसं वगनाट्य असतं तसं शरद पवारांचं राजीनामानाट्य म्हणजे तमाशातील वगनाट्य होतं, असा घणाघात चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केला आहे.
The promise of a new age of limitless clean energy is dawning in France. @FryRsquared goes inside the largest international fusion project ever built https://t.co/4BcFHfMLQK pic.twitter.com/RO99gDeSHK
— Bloomberg Quicktake (@Quicktake) March 16, 2023
यावेळी बावनकुळे यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीवर (Karnataka Assembly Elections) प्रतिक्रिया दिली.
कर्नाटकात भाजपला निवडून येण्यासाठी कुणाचीही गरज नाही. मोदींच्या (PM Narendra Modi) नेतृत्वात आम्ही
कर्नाटक जिंकू तिथे भाजपचे सरकार येईल. भाजप कमळाच्या समोर कॉम्प्रमाईज करत नाही.
मराठी भाषेला आणि मराठी माणसाला न्याय देण्याची आमची भूमिका कायम आहे,
मात्र पक्ष आणि पक्षाचा नेता आमच्यासाठी महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.
LIVE | 📍पुणे | माध्यमांशी संवाद https://t.co/RuSaAdPAWl
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) May 8, 2023
Web Title :- Chandrashekhar Bawankule | BJP leader chandrasekhar bawankules big secret explosion regarding ajit pawar
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update