Chandrashekhar Bawankule | सत्यजीत तांबेंना भाजप पाठिंबा देणार?; भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आज दि.१२ नाशिक पदवीधर मतदार संघात वेगाने घडामोडी घडल्या. यात काँग्रेस पक्षाने उमेदवारी जाहीर करून देखील डॉ. सुधीर तांबे यांनी फॉर्म न भरल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना तोंड फुटले आहे. (Chandrashekhar Bawankule) त्यातच आता यासंबंधी अजूनही नाशिकमध्ये पदवीधर मतदारसंघात आपला उमेदवार जाहीर न केलेल्या भाजपच्या गोटातून एक माहिती समोर येत आहे. याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(Chandrashekhar Bawankule) सविस्तर बोलले. त्यावेळी त्यांनी सत्यजीत तांबे यांनी पाठिंबा मागितल्यास आम्ही देऊ. अशी भूमिका जाहीर केली आहे.

माध्यमांशी संवाद साधताना चंद्रशेखर बावनकुळे(Chandrashekhar Bawankule) यांनी नाशिक पदवीधर संघाच्या निवडणूकीबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, ‘भाजपातर्फे राजेंद्र विखे पाटील यांच्या नावाचाच विचार आम्ही करत होतो. राधाकृष्ण विखे पाटील यांनीच त्यासाठी पुढाकार घेतला होता. पण मागच्या सहा महिन्यांपूर्वी उमेदवारी जाहीर झाली असती तर तयारीला वेळ मिळाला असता, अशी भूमिका राजेंद्र विखे पाटील यांनी मांडली आणि निवडणूक लढविण्यास असमर्थता दर्शविली. आता आम्हाला दिसतंय की, ही अपक्ष निवडणूक होईल. भाजपाने अजून कुणालाही एबी फॉर्म दिलेला नाही. त्यामुळे सत्यजीत तांबे यांनी भाजपाकडे पाठिंबा मागितल्यास विचार करु.’ असे सुतोवाच बावनकुळे यांनी दिले. त्यामुळे एक वेगळीच चर्चा सध्या राज्याच्या राजकारणात सुरू आहे.

नाशिक पदवीधर मतदारसंघात विखे पाटील यांच्यानंतर कुणी तरी उमेदवार मिळावा याची चाचपणी आम्ही केली.
पण कुणाकडूनही उमेदवारी मागण्यात आली नाही. त्यामुळे या मतदार संघात आम्ही कुणालाही एबी फॉर्म दिला नाही. सत्यजीत तांबे यांनी आज तरी आमच्याकडे पाठिंबा मागितला नाही. पण जर याबाबतची भूमिका त्यांनी घेतली तर आम्ही त्याला प्रतिसाद देऊ. असे सूचक वक्तव्य देखील यावेळी बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(Chandrashekhar Bawankule) यांनी केले.

तसेच, पुढे बोलताना ते(Chandrashekhar Bawankule) म्हणाले, ‘देशात आणि राज्यात दिल्लीपासून
गल्लीपर्यंत आमचे सरकार असले तरी काही ठिकाणी आम्ही कमजोर आहोत. हे मान्य करतो.
सहकार क्षेत्र, शिक्षक मतदारसंघ यात आम्ही कमजोर आहोत. राजकारणात एक आणि एक अकरा झाले पाहीजेत.
तिथे एक आणि एक दोन होत नाही. ज्याठिकाणी आम्ही नाही आहोत, तिथे स्पेस निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही
करणारच. नागपूरमध्ये आमचा उमेदवार होता म्हणून आम्ही तिथे दिला.
ज्याठिकाणी आम्ही कमजोर आहोत, त्याठिकाणी एक आणि एक अकरा करावेच लागते.
’ असे देखील यावेळी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
तसेच नाशिक पदवीधर मतदार संघात भाजपच्या खेळीचा काँग्रेस शिकार बनला की काय? अशी चर्चा सुरू झाली आहे.
(Chandrashekhar Bawankule)

Web Title :- Chandrashekhar Bawankule | bjp may will give support to satyajeet tambe says bjp state president chandrashekhar bawankule

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sanjay Shirsat | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीवर बोलले शिंदे गटातील हे आमदार; म्हणाले…

Sourav Ganguly Statement | सचिन-विराटच्या तुलनेवरील वादावर गांगुलीचे मोठे वक्तव्य; म्हणाले…

State Excise Department | अवैध मद्य विक्री व अवैध मद्य सेवन करणाऱ्या विरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई, पुण्यात 25 जणांना न्यायालयाने केला 37 हजारांचा दंड