Chandrashekhar Bawankule | ‘सौ चुहे खा के बिल्ली हज को चली’, बारसु प्रकरणावरुन बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर टीका

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – Chandrashekhar Bawankule | बारसू येथे रिफायनरी प्रकल्प (Barsu Refinery Project) व्हावा यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीच केंद्र सरकारला (Central Government) पत्र दिले होते आणि आता विरोध करत आहेत. सध्या त्यांची अवस्था ‘सौ चुहे खा के बिल्ली हज को चली’ अशी झाली असल्याची टीका भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केली. नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले, बारसू प्रकल्पाला विरोध करणे चुकीचे आहे. उद्धव ठाकरे यांनी सार्वजनिक मंचावरुन त्यांच्या पक्षाची भूमिका मांडली पाहिजे. मात्र वैयक्तिक टीका न करता विकासावर बोलले पाहिजे, असे बावनकुळे म्हणाले. केंद्र आणि राज्य सरकारमध्ये चांगला समन्वय आहे. महाराष्ट्रात डबल इंजिन सरकार आहे. अगोदर खिशाला पेन नसणारे मुख्यमंत्री होते व आता एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे अगदी रस्त्यावर देखील सही करणारे मुख्यमंत्री महाराष्ट्राला भेटले आहेत.

आगामी निवडणुकांबद्दल (Elections-2024) बोलताना बावनकुळे म्हणाले,
पुढील निवडणुकांत 148 हून अधिक जागा जिंकत जनतेला अपेक्षित असलेले सरकार भाजप-शिवसेना युती
(BJP-Shiv Sena Alliance) नक्कीच आणेल असा दावा त्यांनी केला. तसेच बाजार समित्यांमध्ये पक्षीय राजकारण नसते.
याला कोणी आपला गट-तट घेऊ नये. जे निवडून येतात, ते सहकार क्षेत्रात काम करतात. सहकार क्षेत्रात याची-त्याची आघाडी,
कब्जा असे काहीही नसते, असेही बावनकुळे यांनी सांगितले.

 

 

Web Title :-  Chandrashekhar Bawankule | Chandrashekhar Bawankule on uddhav-thackeray-
means-sau-chuhe-khakar-kalki-haj-ko-chali

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Barsu Refinery Project | …तर प्रकल्प करायला हरकत नाही, बारसू प्रकरणावर अजित पवारांनी मांडली भूमिका

MP Supriya Sule | बारसुतील व्हिडिओ शेअर करत खासदार सुप्रिया सुळेंनी सरकारला केली विनंती, म्हणाल्या –
‘कोणताही प्रकल्प बळजबरीने…’

Pune Police Crime Branch News | पुणे पोलिस क्राईम ब्रँच न्यूज : पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून 55 लाखाच्या 162 दुचाकी जप्त,
17 जणांना अटक (Video)

Barsu Refinery Project | बारसूतील आंदोलन तीन दिवसांसाठी स्थगित; जिल्हाधिकाऱ्यांचे चर्चेचे आवाहन, मात्र ग्रामस्थांनी फिरवली पाठ

TDM Marathi Movie | पैसावसूल ! रोमान्स, ऍक्शन अन् कॉमेडीचा तडका असलेला ‘टीडीएम’ प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाने पाहावाच

CM Eknath Shinde | बारसू प्रकरणावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया, म्हणाले-‘स्थानिकांच्या संमतीशिवाय कोणताही प्रकल्प करणार नाही’ (व्हिडिओ)