Chandrashekhar Bawankule On Ajit Pawar | अजित पवारांच्या पुण्याच्या पालकमंत्रीपदावर बावनकुळेंचे वक्तव्य, म्हणाले – ‘जे ठरले तेच झालं’ (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Chandrashekhar Bawankule On Ajit Pawar | महायुतीत सामील झाल्यानंतर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर पुण्याचे पालकमंत्रीपद अजित पवार यांच्याकडे जाणार असल्याची चर्चा होती. हे पद मिळवण्यासाठी अजित पवार यांनी शहरावर विशेष लक्ष केंद्रीत केलं होतं. अखेर राज्यातील 12 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी बुधवारी जाहीर करण्यात आली. या यादीनुसार पुण्याचे पालकमंत्रीपद अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. तर चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोलापूरचे पालकमंत्रीपद सोपवण्यात आले आहे. अजित पवारांच्या नाराजीमुळे त्यांना पुण्याचे पालकमंत्रीपद दिल्याची चर्चा आहे. यावर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर यांनी सातारा येथे पत्रकारांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. (Chandrashekhar Bawankule On Ajit Pawar)

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, पालकमंत्री बदलणे हा अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा आहे. जे ठरलं होतं तेच झालं आहे. अजित पवार कधीही नाराज नव्हते. ते स्पष्टवक्ते आहेत. हे पहिलेच ठरलं होतं. पुण्याचे पालकमंत्री अजित पवार होणार. शेवटी सरकार चालवताना सर्व गोष्टी जुळवाव्या लागतात. तीन पक्षाचं सरकार आहे. त्यामुळे जे ठरलं तेच झालं. कोणत्याही नाराजीमुळे ते पालमंत्री झालेले नाहीत, असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केलं. (Chandrashekhar Bawankule On Ajit Pawar)

बावनकुळे पुढे म्हणाले, अजित पवार पुण्याचे पालकमंत्री होणार हे पहिलेच ठरले होते. त्यामुळे याच्यात राजकीय रंग आणू नये. उलट समाधान झालं पाहिजे की आज 9 पालकमंत्री नव्याने सामिल झाल्यामुळे महाराष्ट्रातील आणखी नऊ जिल्ह्यांना मदत मिळणार आहे. यातून महाराष्ट्राला चांगली उभारी मिळेल असेही बावनकुळे यांनी म्हटले.

काँग्रेस पक्षावर हल्लाबोल करताना ते म्हणाले, काँग्रेस पक्षाच्या रक्तात कन्फ्युजन करण्याचे राजकारण आहे.
काँग्रेसमध्ये ब्लड कॅन्सर आहे. काँग्रेसने 65 वर्ष कन्फ्यूज करण्याचं सरकार चालवलं.
कन्व्हेयन्स करणार नाही, विकासाचं काही सांगणार नाही. भाजप विकासाच्या मुद्यावर मत घेणार आहे.
आम्ही काम सांगून मत मागणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

https://x.com/cbawankule/status/1709485696581591464?s=20

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Political News | दहा वर्षात तयार झालेला पुण्याचा ‘बालेकिल्ला’ लोकसभेच्या तहात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या
स्वाधीन

Bachchu Kadu On Chandrashekhar Bawankule | बच्चू कडूंचा बावनकुळेंना निर्वाणीचा इशारा,
म्हणाले – ‘अजून 10 खासदार पाठवले तरी…’

Pune ACB Trap Case | ठेकेदाराकडे लाच मागणाऱ्या पुणे महावितरणच्या कार्यकारी अभियंता
(क्लास वन) यांच्यावर एसीबीकडून FIR