भारताचे चांद्रयान-२ च्या प्रक्षेपणानंतर ‘हा’ देश झाला भयभीत 

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे ISROने चांद्रयान-२ चे प्रक्षेपण यशस्वी केले आहे. त्यामुळे भारताची अंतराळात ताकद वाढली आहे. मात्र याने ऑस्ट्रेलियाचे लोक भयभीत होत आहे. मात्र भारताच्या चांद्रायान २ चे प्रक्षेपणाने ऑस्ट्रेलियाला घाबरण्यासारखे काय आहे. ऑस्ट्रेलियाच्या भिती मागे कारण आहे, की सोमवारी चांद्रयान२ चे प्रक्षेपण झाल्यानंतर आंतराळ कक्षेत प्रवेश केला आहे. तेव्हा ते ऑस्ट्रेलियाच्या आकाशात दिसले होते. त्यामुळे तेथील लोकांनी त्याला एलियन समूजन घाबरले.

सोमवारी २.४५ मिनीटांवर चांद्रयान २ चे प्रक्षेपण करण्यात आले. त्यानतर संध्याकाळी ७.३० च्या दरम्यान हे चांद्रयान ऑस्ट्रेलियाच्या क्वींसलँड भागातील आकाशात चमकताना दिसले. चांद्रयानची ही चमक पाहुन लोक आश्चर्यचकित झाले. शौना रॉयस नावाच्या व्यक्तीने पहिल्यांदा क्वींसलँड जूलिया क्रीक कारवां पार्कवर असताना चांद्रयान २ पाहिले. त्यानतंर त्याने एबीसी नॉर्थ वेस्टच्या फेसबुक पेजवर जाऊन प्रश्न करत उत्तरे मागितली. या पार्कमध्येच उपस्थित असणाऱ्या वक्तीने याचा व्हीडिओ काढत त्याला एलियनचे युएफओ असं म्हटलं आहे. त्यानतंर सोशल मीडियावर यावर चर्चांना सुरुवात झाली. अनेकांनी हे फोटो व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केले. अनेकांनी याला एलियनचे यूएफओ असं म्हटलं गेले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचे नागरिक घाबले होते.

दरम्यान, एबीसी नॉर्थ वेस्टने काही वेळाने हे यावर क्लिअर करण्यात आले. जे लोक उगाच एलियन म्हणून उत्साहित होत होते ते निराश होणार आहेत. कारण तुम्ही जे पाहिले ते कोणा एलीयनचे आगमन नव्हते तर ते भारत चंद्रावर जात होता. त्यानंतर तेथील नागरिकांची उत्सुकता कमी झाली.

आरोग्यविषयक वृत्त –