कोल्हापुरमधील अनेकांच्या स्वप्नात मी येतो : चंद्रकांत पाटील

कऱ्हाड : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ, काँग्रेसचे आमदार सतेज उर्फ बंटी यांना झोप लागत नाही. सरकार येणार म्हणत आहेत; मात्र बंटी पाटील, हसन मुश्रीफ यांच्यासहीत कोल्हापुरच्या अनेकांना मी स्वप्नात दिसतो, असा टोला महसुल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी लागवला आहे. मलकापूरातील पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रचार सांगता पार पडली तेव्हा ते बोलत होते.

मलकापूरात भाषण करताना चंद्रकांत पाटील यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार बंटी पाटील, कागलचे आमदार हसन मुश्रीफ या नेत्यांचा समाचार घेत त्यांच्यावर टीकाही केली. बंटी पाटील तुम्हाला विधानसभा जिंकता आली नाही. तुम्ही इथे गल्लोगली कशाला फिरताय? तुमचे बाबा राष्ट्रवादीत गेले. तर तुम्ही दोन दिवस घराला कुलूप लावून घरात बसला होता. मी काँग्रेसचा मोठा नेता अन् माझ्या बाबानी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला म्हणून तुम्ही गप्प होता. उत्तर देऊ शकला नाहीत. आमचीच सत्ता येणार सत्ता येणार म्हणणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना झोप लागत नाही हे वास्तव आहे, असा टोला त्यांनी लगावला. यावेळी त्यांनी आमदार बंटी पाटील यांचा एकेरी उल्लेख चंद्रकांत पाटलांनी यावेळी केला.

पश्चिम महाराष्ट्रात सत्ता कोठे आहे. याचे उदाहरण द्या. सांगलीत पण आम्ही सत्ता घेतली तुम्ही काय सांगत सुटला आहात. शासन ज्यांच्याकडे असते. त्यांना माहिती असते. मात्र आमच सरकार येणार आहे, असं सांगणारे जे दमदार नेते आहेत. त्यांनाच झोप लागत नाही. त्यात पृथ्वीराज बाबा, बंटी पाटील, हसन मुश्रीफ यांचा त्यात समावेश आहे. त्यांच्या मी स्वप्नात येतो आहे, असंही त्यांनी यावेळी म्हटलं.

दरम्यान, या कार्यक्रमात भाजपचे नेते अतुल भोसले, सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्यासहीत अनेक स्थानिक नेते उपस्थित होते.