लोकसभेच्या निवडणुकीमुळे CAची परीक्षा पुढे ढकलली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकांमुळे चार्टड अकाउंटन्टची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. आयसीएआयने आज परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती दिली.

लोकसभा निवडणुकीमुळे २ ते १७ मे दरम्यान होणारी चार्टड अकाउंटन्टची परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता ही परीक्षा २७ ते १२ जून दरम्यान होणार आहेत. अशी माहिती इन्स्टिट्युट ऑफ चार्टड अकाउंटन्टस ऑफ इंडियाने (ICAI)दिली.

लोकसभेच्या निवडणुकांसाठी ११ एप्रिलपासून मतदान होणार आहे. एकूण सात टप्प्यात लोकसभेसाठी देशभरात मतदान होईल. मतदानाचा सातवा आणि अखेरचा टप्पा १९ मे रोजी होईल. त्यानंतर २३ मे रोजी मतमोजणी होऊन निकाल लागणार आहेत. निवडणूक आयोगाने रविवारी लोकसभेच्या निवडणुकांची घोषणा केली.


ह्याहि बातम्या वाचा

पुणे-बंगळूर महामार्गावर पावणे दोन कोटीचा गुटखा जप्त

नोकरीच्या अमिषाने तरुणीला ५० हजारांचा गंडा

सुरेखा पवार यांना गुरू-शिष्य पुरस्कार बबन माने यांचाही होणार गौरव

पुणे : संभाजी कदम आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त