मिरजमध्ये विजयी मिरवणुकीवर काँग्रेस समर्थकांकडून दगडफेक

मिरज : पोलीसनामा ऑनलाईन

सांगली – कुपवाड- मिरज महापालिकेच्या निवडणूकीत भारतीय जनता पार्टीने विजय खेचत विरोधकांचा पराभव केला. विजयी उमेदवारांनी प्रभाग क्रमांक ३ व २० मध्ये विजयी मिरवणूक काढली. या मिरवणूकीदरम्यान हाणामारी व दगडफेकीचे प्रकार घडले. याप्रकरणी माजी नगरसेवक महादेव कुरणे व त्यांच्या ७ समर्थकांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रभाग क्र. 20 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयी उमेदवार संगीता हारगे यांची विजयी मिरवणूक जात असता ज्योर्तिंलिंग मंदीराजवळ भाजप कार्यकर्त्यांनी दगडफेक करीत शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस समर्थक राधीका हारगे यांनी भाजपच्या बसगोंडा पाटील, महादेव कुरणे, रवि हारगे, सचिन हारगे, मनोहर कुरणे, अनिता हारगे आणि सारीका उदगावे यांच्या विरुद्ध शहर पोलिसात तक्रार दिली आहे. या संदर्भात जबाबबंदी आदेशाचा भंग केल्या प्रकरणी वरील सर्वांविरुद्ध शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
[amazon_link asins=’B06Y66GKGN’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a3825e3c-97fd-11e8-a04b-29d94f91f55a’]

तसेच संगीता हारगे या विजयी झाल्यानंतर त्यांना हार का घातला असे जाब विचारुन रोहन उदगावे व त्याच्या समर्थकांनी घरात घुसून दमदाटी व घराची कौले फोडल्याची तक्रार एकता पवार यांनी शहर पोलिसात दाखल केली आहे. तर प्रभाग क्र. 3 मध्ये विजयी मिरवणूक जात असताना मिरवणुकीवर तलवार हल्ला करुन खूनाचा प्रयत्न केला म्हणून सचिन उर्फ पिंटू भोसले, दत्ता भोसले, नयन जाधव, सुधीर जाधव या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर याचवेळी तलवार हल्ला करणार्‍या सचिन भोसले याच्या रिक्षाची भाजप कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याबाबत सचिन भोसले याने भाजपच्या अभिषेक चव्हाण व त्याच्या साथीदारांविरुद्ध शहर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या दोन्ही प्रकाराची शहर पोलिस अधीक तपास करीत आहेत.