सांगली : विट्यात पॉलीशच्या बहाण्याने 10 तोळ्यांचे दागिने लंपास

ADV

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – विटा येथील विवेकानंद नगर येथे दागिने पॉलिश करण्याच्या बहाण्याने 10 तोळ्यांचे सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले. शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राधा मुकुंदराव लंगडे यांनी फिर्याद दिली आहे. विवेकानंदनगरात राधा लंगडे या कुटुंबियासमवेत राहतात. शनिवारी त्यांचा मुलगा आणि सून बाहेरगावी गेले होते. तर नातू शाळेत गेला होता. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घराबाहेर दोन अनोळखी तरुण लंगडे यांच्या घरासमोर आले. त्यांनी सध्या दसऱ्याचा सण जवळ आला आहे. घरातील पितळेची भांडी पॉलिश करुन देतो असे सांगितले. त्यांनी देवघरातील तांब्याची भांडी पॉलिश करुन दिली.

ADV

त्यानंतर तुमचे सोन्याची दागिनेही आम्ही पाॉलिश करुन देतो असे सांगून काणातील कर्णफुले पॉशिल करुन दिली. त्यानंतर सोन्याच्या 45 ग्रॅमच्या चार बांगड्या व 50 ग्रॅमच्या दोन पाटल्या असा ४ लाख 45 हजार रुपये किंमतीचे दागिने पॉलिश करण्यासाठी त्या दोन युवकांनी घेतले. घरातील डब्यात हळद व त्यांच्याकडील पावडर टाकली. तो सोन्याचा डबा गॅसवर गरम करा सोने चांगले पॉलिश होईल असे सांगितले. घरात गेल्यावर शंका आल्याने डब्यात हात घालून पाहिले असता डब्यात सोन्याचे दागिने नव्हते. घराबाहेर येवून पाहिले असता ते युवक लंपास झाल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती शेजाऱ्यांना सांगितल्यावर त्यांनीही त्या युवकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु ते सापडले नाहीत.

Visit :- policenama.com