फसवणूक प्रकरणी पिंपरीत 2 ‘बिल्डर’सह 10 जणांवर FIR

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – करार झाल्याप्रमाणे गाळे न देता त्यांची परस्पर विक्री करुन फसवणूक केल्याप्रकरणी अग्रवाल पंजाबी असोशिएटस या कंपनीचे ‘बिल्डर’ विजय अग्रवाल, मोती पंजाबी यांच्यासह दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना २३ नोव्हेंबर २०११ ते ११ नोव्हेंबर २०१९ या दरम्यान पिंपरी येथे घडली. या प्रकरणी गोपीचंद जोधाराम देवनानी (७२, रा. पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तर बिल्डर विजय जगदिशप्रसाद अग्रवाल (६१), मोती उदाराम पंजाबी (६१, दोघेही रा. थेरगाव पुणे) यांच्यासह विनीता ऊर्फ कविता नरेश लिलानी (४६), भारती सी. रायचंदानी (३८), बरखा हरेश देवनानी ऊर्फ कनिष्का अभिषेख नागरानी (३५), अंजु ऊर्फ अंजना पवन देवनानी (४६), पवन लखीमल देवनानी (५१), साहिल पवन देवनानी (२०), अमन पवन देवनानी (२२, सर्व रा. पीडब्ल्यूडी ९/१० पिपंरी कॉलनी, पिंपरी पुणे), प्रिति ऊर्फ रेवा हरेश देवनानी (६५, रा. गणेश पार्क पिंपळे सौदागर पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोपीचंद देवनानी आणि त्यांचे नातेवाईक यांनी सर्वे नं २११ व सीटीएस नं. २५२१/१ ते २५२१/२२ पिंपरी वाघिरे येथील जागा नुतनीकरण करण्यासाठी अग्रवाल पंजाबी असोशिएटस या कंपनीच्या वतीने विजय अग्रवाल, मोती पंजाबी यांना दिली होती. त्यावेळी बिल्डर यांना गोपीचंद देवनानी यांनी जागेची गरज असल्यामुळे २०११ मध्ये विकास करण्यासाठी मागीतली.

त्याबदल्यात डिलक्‍स फॉरच्युन मॉल बांधुन झाल्यावर गोपीचंद देवनानी यांना पहिल्या मजल्यावर शॉप नं १०७, दुसऱ्या मजल्यावर शॉप नं २०९, तिसऱ्या मजल्यावर शॉप नं ३०९ अशी तीन दुकाने कोणताही मोबदला न घेता देतो, असे लिहून दिले होते. तसेच गोपीचंद देवनानी यांना नुकसान भरपाई म्हणुन दर महिन्याला ६५ हजार रुपये देतो, असे सांगितले होते.

याबाबत २३ नोव्हेंबर २०११ रोजी लखीमल हरदासमल देवनानी, पवन लखीमल देवनानी, प्रिति ऊर्फ रेखा हरेश देवनानी, अग्रवाल पंजाबी असोशिएट्‌स या कंपनीच्यावतीने विजय अग्रवाल, मोती पंजाबी यांचे बरोबर गोपीचंद देवनानी यांचा समजोता केला. यामुळे गोपीचंद देवनानी यांनी जागा बिल्डरच्या ताब्यात दिली.गोपीचंद देवनानी यांचे नातेवाईक व बिल्डरने डिड ऑफ कन्फरमेशन असा दस्त हवेली क्रमांक २५ येथे दस्त क्रमांक ७०३३/२०१५ हा केला.

त्यांनतर दुकानांचा ताबा गोपीचंद देवनानी यांना न देता बिल्डरने व त्यांच्या नातेवाईकांनी परस्पर दुसऱ्याच्या नावे करुन फसवणूक केल्याचे गोपीचंद यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like