‘लागीर झालं जी’च्या ‘या’ ग्लॅमरस आणि हॉट अभिनेत्रीला ओळखलता का ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – गेल्या अनेक दिवसांपासून लागिरं झालं जी ही मालिका प्रेक्षकांच्या मनात गाजताना दिसत आहे. त्यातील अजिंक्य आणि शीतल यांची जोडी प्रेक्षकांना विशेष आवडली आहे. असे असले तरी इतर कलाकारही काही कमी नाहीत. कारण या मालिकेतील प्रत्येक व्यक्तीरेखेचं विशेष महत्त्व आहे. इतरही पात्र प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडताना दिसत आहेत. त्यातील जयडीची रिअल लाईफ जर पाहिली तर जयडी फारच ग्लॅमरस आणि स्टायलिश असल्याचे दिसत आहे.

पूर्वा शिंदे असं जयडीची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेत्रीचं नाव आहे. चाहत्यांमध्ये पूर्वा शिंदेदेखील लोकप्रिय ठरताना दिसत आहे. मराठीतील आयब्रो गर्ल म्हणून पूर्वा शिंदे म्हणजेच जयडीला ओळखले जाते. दरम्यान जयडीचे सोशल मीडियावरील फोटो पाहता ती अतिशय स्टायलिश असल्याचे दिसत आहे. तिचे विविध अदामधील फोटो पाहून ती किती ग्लॅमरस आहे याचा अंदाज येतो. रिअल लाईफमध्ये ती किती राँकिंग आहे ते दिसून येते.

पूर्वाचे इन्स्टाग्रामवरील फोटो जर पाहिले तर लक्षात येते की, पूर्वाला वेस्टर्न कपडे घालायला खूप आवडतं. तिने साकारलेल्या जयडीच्या भूमिकेमुळे पूर्वा शिंदे ही प्रेक्षकांना भावल्याचे दिसत आहे. तिचे इन्स्टाग्रामवरील फॉलोवर्स 37 हजारांपेक्षा अधिक आहेत. तिचा रिअल लाईफ स्टाईलीश आणि हॉट अंदाज पाहून तिच्या चाहत्यांच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसत आहे.

पर्वा शिंदेच्या आधी ही भूमिका अभिनेत्री किरण ढाणे साकारत होती. मानधन वाढवून न दिल्याने तिने मालिका सोडल्याचे समजत आहे. किरण ढाणे ही आता एका नव्या मालिकेत डॅशिंग पोलिसाच्या भूमिकेत झळकताना दिसत आहे.