‘एक्सप्रेस-वे’वर केमिकलचा टँकर दरीत कोसळून जळून खाक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर केमिकल घेऊन जाणारा ट्रक दरीत कोसळून झालेल्या अपघातात संपूर्ण ट्रक जळून खाक झाला. ही घटना गुरुवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास खोपोलीजवळील ढेकू गावाजवळ घडली. यात कोणतीही जिवित हानी झाली नसल्याचे महामार्ग पोलिसांनी सांगितले.

याबाबत महामार्ग पोलिसांनी सांगितल्यानुसार, केमिकलने भरलेला टँकर पुण्याहून मुंबईकडे जात होता. बोरघाटातून तो जात असताना पाठीमागून आलेल्या ट्रलरने त्याला धडक दिली. त्यामुळे टँकर रस्त्याच्या कडेला लावलेले लोखंडी रेलिंग तोडून दरीत ३० फुट खाली कोसळला. खालच्या बाजूला सर्व्हिस रोड आहे. त्याच्या एका बाजूला हा टँकर कोसळला.

आत केमिकल असल्याचे त्याला आग लागून त्या संपूर्ण टँकर जळून खाक झाला. या घटनेत ट्रलरलाही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. खोपोली नगर पालिकेचा अग्निशामक दलाचा बॅम्ब घटनास्थळी पोहचला असून आग विझविण्याचे काम सुरु आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/