Chhagan Bhujbal | ‘आता बाळासाहेब थोरातांनी बोललं पाहिजे’ – छगन भुजबळ.

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Chhagan Bhujbal | काल दि.०४ रोजी पत्रकार परिषद घेत नाशिक पदवीधर मतदारसंघाचे (Nashik Graduate Constituency) नवनिर्वाचित आमदार सत्यजीत तांबे (MLA Satyajit Tambe) यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच यावेळी बोलताना सत्यजीत तांबे म्हणाले की आमच्या आणि बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या कुटुंबाला बदनाम करण्याचा कट रचण्यात आला होता. असे देखील ते म्हणाले. तर सत्यजीत तांबे हे काँग्रेस पक्षात परतणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या सर्व प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

 

माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ यांनी आपली या सर्व प्रकरणावरील भूमिका स्पष्ट केली. छगन भुजबळ म्हणाले, ‘सत्यजीत तांबे यांना काँग्रेस पक्ष सोडायचा असेल तर ते काँग्रेसवर टीका करणारच. नाना पटोलेंवर जे आरोप झाले, त्याला ते (नाना पटोलेचं) उत्तर देतीलचं. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी याबाबत बोललं पाहिजे. यामध्ये नेमकं काय घडलं? हे फक्त बाळासाहेब थोरात सांगू शकतात. असे मला वाटते. सत्यजीत तांबे ज्या पद्धतीने आरोप करत आहेत, ते पाहता त्यांचा काँग्रेसमध्ये परतण्याचा हेतू आहे, असे मला वाटत नाही. ‘ असे म्हणत भुजबळांनी सत्यजीत तांबे प्रकरणावर त्यांचे मत व्यक्त केले.

तर पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीवर देखील यावेळी बोलताना त्यांनी (Chhagan Bhujbal) भाष्य केले.
ते म्हणाले, ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा फोन आला होता.
मात्र ही निवडणुक बिनविरोध करायची की नाही हे आमचे नेते एकत्र बसून ठरवतील. आमचे शीर्षस्थ नेते यावर योग्य तो निर्णय घेतील. यावर चर्चा झाली आहे. लवकरच यावर निर्णय घेण्यात येईल. असे देखील यावेळी बोलताना छगन भुजबळ म्हणाले.
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांची देखील ही निवडणुक बिनविरोध व्हावी.
अशी भूमिका आहे. तसे पत्र देखील त्यांनी समाजमाध्यमांवर प्रसारित केले आहे.
आता यावर महाविकास आघाडीचे नेते काय निर्णय घेतात. याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

 

Web Title :- Chhagan Bhujbal | chhagan bhujbal and balasaheb thorat have to give clarification on satyajeet tambe allegations

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Nana Patole | मुख्यमंत्र्यांच्या फोननंतर देखील नाना पटोले कसबा विधानसभा पोटनिवडणुक लढविण्यावर ठाम; म्हणाले…

Pune Bypoll Elections | कसबा आणि चिंचवड मतदारसंघासाठी जिल्हा प्रशासनाकडून मतदान केंद्रे निश्चित

Pervez Musharraf Passes Away | पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांचे निधन; वयाच्या ७९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास