Chhagan Bhujbal | छगन भुजबळ यांचं सूचक वक्तव्य; म्हणाले – ‘पंकजा मुंडेंना डावलण्यात आलं, खडसेंचंही तेच झालं; याचा परिणाम… ‘

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Chhagan Bhujbal | राज्यसभा निवडणूक (Rajya Sabha Elections) 10 जून रोजी होणार आहे. आणि 20 जून रोजी होणा-या विधान परिषद निवडणूकीवरून (Maharashtra MLC Elections 2022) राज्यात गोंधळ सूरू आहे. विधान परिषदेच्या जागेसाठी भाजपने (BJP) पाच उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मात्र विधान परिषदेसाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना डावलण्यात आलं आहे. यावरुन राज्यात मोठी चर्चा रंगली आहे. पंकजा मुंडेंचं नाव चर्चेत असूनही त्यांना उमेदवारी देण्यात आले नसल्याने मुंडे समर्थकामधून नाराजी दिसून येतेय. अशातच राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

 

त्यावेळी छगन भुजबळ (Chhagan Bhujbal० म्हणाले, “पंकजा मुंडे यांचे स्टेटमेंट वाचले होते.. दिलेल्या संधीचं सोनं करेन. परंतु त्यांना डावलण्यात आले आहे. त्यांना पहिल्या क्रमांकावर उतरता आलं असतं. संधी द्यायला हवी होती. खडसेंच्या बाबतीत तेच झालं होतं. पंकजा मुंडे यांना परत घेतलं जाईल वाटलं होतं. पण, असं काही झालं नाही. याचा परिणाम हा लोकांवर व समाजावरही होत असतो,” असं सूचक विधान त्यांनी केलं आहे.

 

भाजपकडून (BJP) विधान परिषदेसाठी उमेदवारी जारी करण्यात आली आहे. प्रवीण दरेकर (Praveen Darekar),
प्रसाद लाड (Prasad Lad), उमा खापरे (Uma Khapre), श्रीकांत भारतीय (Srikant Bharatiya), राम शिंदे (Ram Shinde) यांना उमेदवारी देण्यात आली. दरम्यान, पंकजा मुंडे यांना यावेळीही विधान परिषदेवर संधी मिळाली नाही. त्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आलं आहे.

दरम्यान, “भाजपने राज्यसभा निवडणुकीत जास्त उमेदवार दिला आहे. मात्र आघाडीचे उमेदवार निवडून येतील.
आता विधान परिषदेच्या निवडणुकीतही तयारी करावी लागणार आहे, कंबर कसावी लागणार आहे.
महाविकास आघाडीचे उमेदवार राज्यसभेवर सर्व निवडून येतीलच आणि त्याच पावलावर पाऊल टाकून
विधान परिषदेतही आघाडीचे उमेदवार निवडून येतील,” असं छगन भुजबळ म्हणाले.

 

Web Title :- Chhagan Bhujbal | Chhagan Bhujbal | ncp leader minister speaks on bjp leader pankaja munde maharashtra vidhan parishad eknath khadse rajya sabha election 2022

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | दरमहा 10 टक्के व्याज उकळूनही धमकावणारा सावकार अटकेत

 

Maharashtra Crime | सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची 6 व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या, प्रचंड खळबळ

 

HSC 12th Result 2022 | बारावीचा निकाल जाहीर ! यंदाही कोकण विभागानं मारली बाजी; 94.22 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण