Chhagan Bhujbal on Rohit Pawar | ‘रोहित पवारला सांगा, तुझा जन्म…’, छगन भुजबळ संतापले

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – Chhagan Bhujbal on Rohit Pawar | मंत्री छगन भुजबळ यांनी आमदार रोहित पवार यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. माझ्यावर टीका करण्यापूर्वी थोडा इतिहास समजून घ्या, त्यांना इतिहास ठाऊक नाही, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर राज्य मंत्रिमंडळाच्या (State Cabinet) खातेवाटपाची चिंता करु नका. खातेवाटप लवकरच होईल असं सांगताना महाविकास आघाडी सरकारच्या (Maha Vikas Aghadi Government) काळात एक महिन्यांनी खाते वाटप झाले होते, अशी आठवण छगन भुजबळ यांनी विरोधकांना करुन दिली. (Chhagan Bhujbal on Rohit Pawar)

 

काय म्हणाले होते रोहित पवार?

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) नाशिकच्या अनेक आठवणी सांगत असतात. शरद पवार येवल्यात अन्याय झालेल्यांना आशीर्वाद देण्यासाठी येणार आहेत. पवारांची आशीर्वाद देण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. त्यांनी दिलेल्या आशीर्वादाचे भविष्यात चांगले परिणाम दिसतील अशी टीका रोहित पवार यांनी छगन भुजबळ यांच्यावर केली होती. या टीकेला छगन भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिले आहे. (Chhagan Bhujbal on Rohit Pawar)

 

काय म्हणाले छगन भुजबळ?

रोहित पवारला सांगा, मी जानेवारी, फेब्रुवारी 1985 मध्ये आमदार झालो. एप्रिल 1985 ला मुंबईचा महापौर (Mumbai Mayor) झालो. त्यानंतर चार महिन्यांनी तुमचा जन्म झाला. त्यामुळे मला मोठं केलं, मोठं केलं असल्या फालतू गोष्टी करु नका. इतिहास जाणून घ्या, असा सल्ला भुजबळ यांनी रोहित पवारांना दिला.

 

छगन भुजबळ एक सामान्य कार्यकर्ता म्हणून शरद पवारांकडे आला नव्हता. त्यावेळी मी शिवसेनेचा नेता (Shiv Sena Leader) होतो आमदार होतो. आज किती दिवस हे चाललं आहे. अजित पवार (Ajit Pawar) तुम्हाला भेटत आहेत. अजित पवार आणि तुमचं पवार घराणं यांनी ठरवून शरद पवारांचा राजीनामा घ्यायचं ठरवलं, तेव्हा आम्हाला सांगितलं होतं का? असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. जास्त मी याला किंमत देत नाही. ते जेवढं पुढे येतील तेवढा मी त्यांच्या मतदारसंघात जाऊन उत्तर देईन, असा इशारा छगन भुजबळ यांनी रोहित पवारांना दिला.

 

अजित पवार यांना चार ते पाच लोक व्हिलन करत आहेत. पक्ष फुटायचं खापरही अजित पवारांवर काही लोक फोडत आहेत. नाशिकमध्ये मी बॅनर पाहिला त्यावर अजित पवारांचा फोटोही नव्हता असं रोहित पवार म्हणाले होते. त्यावरुनच भुजबळांनी आता रोहित पवारांचा एकेरी उल्लेख करत त्यांना सुनावलं आहे.

शरद पवार यांनी नुकतीच येवल्यात पहिली जाहीर सभा घेतली. या सभेत त्यांनी कुणाचंही नाव न घेता अनेकांवर निशाणा साधला.
आता अजित पवार गट उत्तर सभा घेणार का? या प्रश्नावर भुजबळ म्हणाले, लवकरच त्याचे नियोजन केले जाईल.
सद्यस्थितीत इतर आमदारांच्या भेटीगाठी सुरु आहेत. काही आमदार हे सुरुवातीला पवार यांच्यासोबत होते,
ते आता परत येत आहेत. या आमदारांचे प्रतिज्ञापत्र तयार करण्याचे काम सुरु आहे. दरम्यान,
छगन भुजबळ पुणे दौऱ्यावर असून ते फुले वाड्याला भेट देणार आहेत. तसेच महात्मा ज्योतिबा फुले (Mahatma Jyotiba Phule)
आणि सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांचे आशीर्वाद घेणार आहेत. ते आमच्यासाठी ऊर्जा स्थान असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

 

 

Web Title : Chhagan Bhujbal on Rohit Pawar | chhagan bhujbal vs rohit pawar bhujbal
gave strong answer to him on ncp split

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा