पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाचा PAK सेना प्रमुखांना ‘सुप्रीम’ झटका, कार्यकाळ वाढवण्यास ‘नकार’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानी सैन्याला मोठा झटका लागला आहे. पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आसिफ खोसा यांनी पाकिस्तान सैन्याचे प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांना दुसऱ्यांदा सेनाध्यक्ष बनण्याच्या नोटिफिकेशनला सस्पेंड केले आहे. न्यायालयाकडून इमरान खान सरकारच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले आहे आता यावर गुरुवारी सुनावणी होईल. पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालायने सेना प्रमुखांच्या कार्यकाळातील नियमांवर प्रश्न उपस्थित करण्यात आले. पंतप्रधान इमराना खान यांनी 19 ऑगस्टला एका अधिकृत अधिसूचनेद्वारे जनरल बाजवा यांच्या कार्यकाळात 3 वर्षांची वाढ केली होती. यामागे त्यांनी क्षेत्रीय सुरक्षेचे कारण देण्यात आले होते.

आदेश रद्द –
बाजवा यांचा मूळ कार्यकाळ 29 नोव्हेंबरला समाप्त होणार आहे. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने कायदेशीर प्रकियेत त्रुटी असल्याचे सांगत सरकारचा आदेश रद्दबातल ठरवला. बाजवा यांच्या कार्यकाळात करण्यात आलेल्या विस्ताराच्या विरोधात रियाज नावाच्या व्यक्तीने पाकच्या सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

पाक सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर पाकिस्तानच्या कॅबिनेटने सेना नियम आणि नियमन धारा 255 मध्ये संशोधन केले आणि नियमातील कायदेशीर त्रुटी दूर करण्यासाठी ‘कार्यकाळात विस्तार’ हा शब्द सहभागी केला. कॅबिनेटने दोन बैठकांमध्ये कार्यकाळ विस्ताराला नवे प्ररुप दिले आणि राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी त्याला मंजूरी दिली.

पीएम आणि राष्ट्रपतीनी दिली निर्णयाला मंजूरी –
पाक पंतप्रधान आणि राष्ट्रपतीनी या अधिसूचनेला मंजूरी दिली आहे. पाकच्या सर्वोच्च न्यायालयाने 3 न्यायाधीशांच्या पीठाने बुधवारी या प्रकरणार सुनावणी केली. या पीठात सरन्यायाधीश खोसा, न्यायाधीश अजहर आलम खान मियाखेल आणि न्यायाधीश सय्यद मंसूर अली शाह यांचा समावेश आहे. फारुग नसीम, बाजवा यांची बाजू मांडत आहे ज्यांनी यासाठी काल कायदा मंत्रिपदाचा राजीनामा दिला. सरन्यायाधीशांच्या मते सेना प्रमुखांच्या कार्यकाळाचा विषय अत्यंत महत्वाचा आहे.

ते म्हणाले की, आतापर्यंत 5 ते 6 जनरलने आपला कार्यकाळ वाढवून घेतला आहे. आम्ही या प्रकरणावर पूर्ण काम करु जेणे करुन भविष्यात ही अडचणी पुन्हा येणार नाही. हा अत्यंत महत्वाचा विषय आहे आणि संविधानात याबाबत काहीही नाही.पाकिस्तानी सैन्याने देशाच्या 70 वर्षांच्या इतिहासात आधिक काळ शासन संभाळले आहे.

Visit : Policenama.com