आमच्या यात्रेचा प्रतिसाद पाहून विरोधकांना यात्रा काढण्याचा ‘उत्साह’, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

धुळे : पोलिसनामा ऑनलाईन – भाजपच्या महाजानदेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला गुरुवार पासून सुरूवात झाली असून यावेळी सभेनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी विरोधकांवर कडाडून टीका केली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला टोला लगावत आम्हाला मिळणारा प्रतिसाद पाहून अनेक पक्ष यात्रा काढायला लागल्याची टीका केली आहे.

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले कि, आमच्या यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झालेली असताना अनेक पक्षांनी देखील स्वतःच्या यात्रा काढण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर त्यांनी टोला लागवताना म्हटले कि, यात्रा काढण्याची परंपरा हि भाजपची असून आम्हाला संघर्षाचा वारसा आहे. त्यामुळे त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत, मात्र त्यांची भ्रष्टाचार यात्रा आहे कि, संघर्ष यात्रा आहे हेच कळत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेवर टीका करताना मुख्यमंत्री म्हणाले कि, त्यांच्या यात्रेची काय अवस्था झाली आहे हे सर्वांना माहित आहे. त्याचबरोबर हेच सरकार आपल्या अपेक्षा पूर्ण करणार असल्याचा विश्वास देखील जनतेच्या मनात निर्माण झाल्याचे देखील त्यांनी म्हटले. एकीकडे काँग्रेसची भ्रष्टाचाराची यात्रा निघालेली असताना त्यांच्या यात्रेचे काय होईल हे त्यांनाच माहित. असेदेखील यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.

दरम्यान, आतापर्यंत या सरकारने अनेक जनहिताची कामे केली असून राज्यातील जनता आमच्या बाजूने असल्याने पुन्हा एकदा युतीचेच सरकार येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर महाराष्ट्र सर्वच क्षेत्रात प्रगती करत असून सर्व विभागांत महाराष्ट्राचा क्रमांक पहिल्या तीन राज्यांत असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

आरोग्यविषयक वृत्त –

 

You might also like