कौतुकास्पद ! आईच्या दागिन्यांसाठी ‘हा’ चिमुकला भिडला चोरांना

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – विरारमध्ये एका लहानग्याने आपल्या पराक्रमाने थक्क केले असून त्याने आपल्या आईचे दागिने वाचवण्यासाठी चक्क चोरांशी पंगा घेतला. या चिमुरड्याने चोरांशी दोन हात करत आपल्या आईच्या दागिन्यांचे रक्षण केले. विरारमधील हि घटना असून या मुलाच्या साहसामुळे या चोरांना पकडण्यात यश आले आहे.

काल मंगळवार दुपारची ही घटना असून दिव्या महाडिक या विरार येथील रहिवासी आपल्या मुलीला शाळेत सोडवण्यासाठी चालल्या होत्या. त्यावेळी त्यांचा मुलगा तनिष हा एकटाच घरी होता. त्यावेळी या मुलाला एकटा पाहून एक चोरटा त्यांच्या घरात चोरी करण्यासाठी घुसला. त्यावेळी त्याने या मुलाला धमकावत घरातील दागिने घेऊन पोबारा करण्याचा प्रयत्न केला. मात्र या लहानग्याने त्या चोराला अडविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आपल्यापेक्षा मोठ्या असलेल्या या चोराला त्याला अडविता येत नसल्याने त्याने मोठ्याने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. त्यावेळी मुलाची आई दिव्या महाडिक या देखील घरी आल्या. त्यांनी देखील या मुलासोबत त्या चोराला पकडण्याचा प्रयत्न केला. त्यांनतर या दोघांचा आरडाओरडा ऐकून परिसरातील नागरिकांनी धाव घेत या चोरट्याला चांगलाच चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले.

दरम्यान, पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याने आपल्या सर्व गुन्ह्यांची कबुली दिली असून तो सराईत चोर असून त्याने याआधी देखील 7 ते 8 घरफोड्या केल्या असून या मुलाच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

आरोग्यविषयक वृत्त –