उसने घेतलेले 12 हजार रुपये परत न दिल्याने गुप्तांगाला लावली मिरची पावडर, प्रचंड खळबळ

खरगोन (मध्य प्रदेश) : वृत्तसंस्था – उधार घेतलेले 12 हजार रुपये परत केले नाहीत म्हणून एका तरुणाला बेदम मारहाण केली. धक्कादायक बाब म्हणजे गुंडांनी तरुणाच्या गुप्तांगाला मिरची पावडर देखील लावली. हा प्रकार मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यात शनिवारी घडला. हा प्रकार सुरु असताना तरुणाच्या मदतीला कोणीच आले नाही. या तरुणाला स्थानिक गुंडांनी मारहाण करत गुप्तांगाला मिरची पावडर लावली.

पीडित तरुणाने उसने घेतलेले पैसे परत न केल्यामुळे त्याला मारहाण केल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी मारहाण करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी शोएब या तरुणाने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शोएबने आरोपींकडून 12 हजार रुपये उसने घेतले होते. काही कारणास्तव त्याला पैसे परत करणे जमले नाही. त्यामुळेच त्याला बेदम मारहाण करण्यात आली. तसेच त्याच्या गुप्तांगाला मिरची पावडर लावण्यात आली.

शोएबच्या तक्रारीनंतर पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले आहे. आरोपींनी शोएबला बोलावून घेत त्याला भर चौकामध्ये मारहाण करण्यात आली. त्यानंतर चौकातच सर्वांसमोर त्याच्या गुप्तांगाला मिरची पावडर लावण्यात आली. हा प्रकार आरोपींनी चित्रीत करून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून स्थानिक गुंडांच्या भितीमुळे पीडित तरुणाच्या मदतीला कोणी आले नसल्याचे सांगण्यात येत आहे.

Visit : Policenama.com