Coronavirus : चीनमध्ये 18 सप्टेंबर 2019 ला ‘कोरोना’बद्दल काय झालं होतं ? ‘हैराण’ करणारा झाला खुलासा

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : ही बाब आहे 18 सप्टेंबर 2019 ची. दुपारी वुहानमधील तिआन्हे विमानतळाच्या कस्टम कार्यालयात आपत्कालीन संदेश आला. संदेशात म्हटले की, लँडिंग फ्लाइटमधील एक प्रवासी आजारी आहे आणि त्याला श्वास घेण्यास त्रास होत आहे. यानंतर विमानतळाचे कर्मचारी आपत्कालीन स्थितीत गेले. माहितीनुसार, 18 सप्टेंबर रोजी आपत्कालीन संदेश मिळाल्यानंतर वुहान येथील विमानतळावरील व्यवस्थापकाने आपल्या कर्मचार्‍यांना अशा आपत्कालीन काळासाठी तयार केलेल्या संपूर्ण प्रक्रियेची माहिती दिली. कर्मचार्‍यांनी संरक्षक मास्क लावून आवश्यक कारवाई करण्यास सुरवात केली. वुहानमधील प्रथमोपचार केंद्राने तपासणीनंतर थोड्याच वेळात संबंधित रुग्णाला नोव्हेल कोरोना विषाणूची लागण झाल्याचे समजले. चिनी माध्यमांनी या संपूर्ण घटनेला एक ड्रिल म्हटले आहे.

त्यानंतर चिनी माध्यमांनी सांगितले होते की, वर्ल्ड मिलिटरी गेम्स आयोजित करण्याच्या संदर्भात इमर्जन्सी रिपॉन्सची तपासणी करण्यासाठी कोरोना विषाणूचा अभ्यास केला गेला. पुढच्या महिन्यात चीनमध्ये होणाऱ्या वर्ल्ड मिलिटरी गेम्समध्ये 10,000 सहभागी होणार होते. अधिकाऱ्यांनी ड्रिलला यशस्वी असल्याचे म्हंटले होते. पण आता आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये असे प्रश्न उपस्थित होत आहेत की चीनने हा अभ्यास का निवडला? लोकांनी सोशल मीडियावर असे प्रश्न देखील उपस्थित केले आहेत की त्यांनी केवळ नवीन कोरोना विषाणूवरच ड्रिल का केली?

त्याच वेळी, एका फ्रेंच ऍथलिटने गेल्या आठवड्यात सांगितले की, त्यांना मते, वर्ल्ड मिलिटरी गेम्समध्ये भाग घेताना अनेकांना कोविड – 19 ची लागण झाली. विश्वविजेते पेंटाथलीट इलोडी क्लाऊवेल म्हणाले – ‘मिलिट्री खेळांच्या वेळी बरेच खेळाडू खूप आजारी पडले.’ 18 ऑक्टोबर 2019 रोजी सुरू झालेला जागतिक सैन्य खेळ 9 दिवस चालला. दरम्यान, काही दिवसांपूर्वी ही माहिती समोर आली होती की, 27 डिसेंबर रोजी पॅरिसमधील रुग्णालयात एका व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर मासे विक्रेत्यास न्यूमोनियाचा संशय आला. जेव्हा डॉक्टरांनी त्यांचा नमुना रुग्णालयात कोरोनासाठी तपासला तेव्हा विषाणूची पुष्टी झाली. ती व्यक्ती परदेशातही गेली नव्हती.