Coronavirus : खरा ठरला आरोप, चीननं नष्ट करायला लावले सुरूवातीचे ‘सॅम्पल’ ?

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : चीनने हे मान्य केले आहे की त्यांनी कोरोना विषाणूचे प्रारंभिक नमुने नष्ट केले आहेत. अमेरिकेने यापूर्वीही चीनवर हे आरोप केले होते. गेल्या महिन्यात अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी असा दावा केला होता की चीनने विषाणूचे नमुने नष्ट केले आहेत. एका अहवालानुसार, चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाचे सुपरवायझर लियू डेंगफेंग यांनी शुक्रवारी कबूल केले की चीनी सरकारने 3 जानेवारी रोजी आदेश जारी केला होता की अनधिकृत लॅबमधून कोरोना विषाणूचे नमुने नष्ट करण्यात यावे.

तथापि चीनच्या अधिकाऱ्याने त्या आरोपांना फेटाळून लावले, ज्यात म्हटले होते की चीनने काही लपविण्याच्या उद्देशाने विषाणूचे नमुने नष्ट केले होते. लियू डेंगफेंग यांनी दावा केला – ‘प्रयोगशाळेत जैविक सुरक्षा आणि यापुढे कोणताही अपघात होऊ नये, या उद्देशाने विषाणूचे नमुने नष्ट करण्यास सांगण्यात आले.’ चीनच्या नॅशनल हेल्थ कमिशनच्या अधिकाऱ्याने शुक्रवारी बीजिंगमध्ये पत्रकार परिषदेत विषाणूचे नमुने संपवल्याची माहिती दिली. लियू डेंगफेंग म्हणाले की अशा नमुन्यांची लॅब अनधिकृत होती आणि त्यांना चीनच्या आरोग्य कायद्यानुसार विषाणूचे निर्मूलन करायचे होते.

लियू डेंगफेंग म्हणाले की विषाणूचे नमुने नष्ट करण्याचे आदेश तेव्हा जारी करण्यात आले जेव्हा सार्स-कोव्ह -2 (SARS-CoV-2) चे क्लास -2 या अत्यंत रोगजनक विषाणूच्या रूपात वर्गीकरण केले गेले होते. गेल्या महिन्यात अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पीओ म्हणाले की, 3 जानेवारीचा चीनचा आदेश हा साथीचा रोग लपविण्याचा प्रयत्न होता. चीनने कोरोना विषाणूवर सेन्सॉरिंग रिसर्च केल्याचा आरोपही त्यांनी केला.

माईक पोम्पीओ म्हणाले होते की चीनने विषाणूवरील संशोधनावर सेन्सॉर लावून या आजाराविरूद्ध जगातील लढाईला प्रभावित करण्याचा प्रयत्न केला होता. ते म्हणाले होते- ‘चीनच्या कम्युनिस्ट पक्षाने विषाणूशी संबंधित माहिती दडपण्याचा प्रयत्न केला. हा विषाणू कोठून पसरला, त्याचा प्रसार कसा झाला आणि मानवांकडून मानवांना संसर्ग कसा होत आहे, याबद्दल माहिती लपविली आणि या कामात डब्ल्यूएचओला देखील सोबत घेतले.